आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेला बुट्टी मारण्यासाठी भावंडाचे अपहरण नाट्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - देगावरोड भागात राहणारे दोन बहीण-भावंडे शहराच्या मध्यवर्ती भागातील एका शाळेत शिकतात. दोघे दहा ते बारा वयोगटातील अाहेत. शाळेला सुटी मारण्यासाठी अपहरणाचा बनाव केला. दोघेजण दुपारी बाराच्या सुमाराला शाळेत अालेही. नंतर दप्तर घेऊन घरी गेले. कालांतराने पालकांनी शाळेबाबत चौकशी केली असता अाम्हाला दोघांना कारमधून काहीजणांनी पळवून नेले. त्यांच्या हाताला चावा घेऊन त्यांच्या तावडीतून सुटून अाल्याचे सांगितले. पालकांना ही बाब एेकून धक्काच बसला. लागलीच त्यांनी पोलिसांना मािहती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घरी जाऊन चौकशी केली. मुलांनी मात्र प्रांजळपणे कबुली दिली की, अाम्हाला अाज शाळेला बुटी मारायची होती. म्हणून हा बनाव केला. मुलांनी कबुली दिल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मुलांनी असे घडवून आणले नाट्य
त्याचेअसे झाले, देगाव रोडवरील दोन मुले एका शाळेत शिकतात. अाज बुटी मारण्याचे ठरवले. पण, कारण काय सांगायचे हे त्यांना लवकर डोक्यात अाले नाही. अाजारी असल्याचे सांगायचे तर अंगात ताप नाही, अन्य लक्षणेही नाहीत. मग अपहरणाचा बनाव करायचे ठरवले. घरी गेल्यानंतर दोघांनी दप्तर लपवून ठेवले. काही वेळानंतर पालकांनी चौकशी केली असता अामचे अपहरण झाले होते, चावा घेऊन त्यांच्या तावडीतून सुटल्याचे सांगितले. पालकांना घामच फुटला. पोलिसांना संपर्क केल्यानंतर वरिष्ठ अधिकारी घरी अाले. चौकशीत अपहरण नाट्याची हकीकत मुलांना सांगता येईना. घटनास्थळ माहिती वेगवेगळी देऊ लागले. कालांतराने मुलांना पोलिसांनी खरा बनाव अाहे काय अाहे अशी विचारताच मुलांना खरा प्रकार सांगितला. या घटनेला पोलिस निरीक्षक विजय साळुंखे यांनी दुजोरा दिला.
बातम्या आणखी आहेत...