आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Six Thousand Auto Rickshaw, Token Booking Only 427

शहरात रिक्षा सहा हजार, टोकन नोंद फक्त ४२७

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी परमीट रिक्षा, अॅपेरिक्षांना विशिष्ट टोकन नंबर देण्याचे काम वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (अारटीअो) यांनी हाती घेतले अाहे. जानेवारीपर्यंत नंबर घेण्याचे अावाहन करण्यात अाले होते. ४२७ रिक्षाचालकांनी टोकन नंबर नोंदवून घेतले अाहे. तब्बल साडेपाच हजाराहून अधिक रिक्षाचालकांनी टोकन नंबर नोंदवून घेतले नाही. यावरून पोलिसांची ही मोहीम यशस्वी होणार की नाही हे प्रश्नचिन्ह अाहे.
डिसेंबर महिन्यामध्ये सर्व रिक्षाचालकांची बैठक घेऊन टोकन नंबर घेण्यासाठी सूचना करण्यात अाली होती. जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. तरीही अाज सोमवारपर्यंत ४२७ रिक्षाचालकांनीच टोकन नंबर घेतल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. टोकन नंबर मुदतीत रिक्षाचालकांनी स्वत:हून घेणे अपेक्षित होते.

अाता कारवाई मोहीमच घ्यावी लागेल
रिक्षाचालकांना टोकन नंबर घेण्यासाठी एक जानेवारीपर्यंत मुदत देण्यात अाली होती. चार दिवसांनंतरही संमिश्र प्रतिसाद अाहे. रिक्षाचालकांनी वाहनाची कादगपत्रे अाणून टोकन नंबर घ्यावा. अन्थया दोन दिवसांत कारवाई मोहीम घेण्यात येईल. महिपती इंदलकर, सहायक पोलिस अायुक्त

ठळक मुद्दे....
>६३०० अॅपेरिक्षा परमीट संख्या
>६० तीस अासनी परमीट रिक्षांची संख्या
>टोकन नंबरचालकाच्या पाठीमागे देण्यात येत अाहे
>याशिवायसमोरीलकाचावरही टोकन नोंदवा
>रिक्षा,अॅपेरिक्षाततीनच प्रवासी पाहिजे
>चालकांनाबॅच,बिल्ला, ड्रेसकोड सक्तीचे करा
>होटगीरस्ता,विजापूर रस्ता, जुना पुणे नाका ते सातरस्ता या मार्गावर रिक्षांना विशिष्ट थांबे द्यावेत.

काय अाहे टोकन नंबर?
परमीटरिक्षांची सर्व कागदपत्रे, बॅच, बिल्ला तपासले जाते. त्यासाठी रिक्षा वाहतूक पोलिस विभागात अाणण्याची गरज अाहे. कागदपत्रे बरोबर असतील तर विशिष्ट नंबर ( पी वन, पी टू, पी थ्री) दिला जातो. चालकाच्या पाठीमागील बाजूला हा नंबर असतो. अप्रिय घटना घडल्यास प्रवाशांनी हा क्रमांक पोलिसांना सांगितल्यास त्याचा शोध घेण्यास मदत होणार अाहे.

शहर पोलिसांच्या मदतीने संयुक्तपणे कारवाई मोहीम करू
शहर वाहतूक नियंत्रण पोलिस अारटीअो यांचा हा संयुक्त उपक्रम अाहे. रिक्षाचालकांनी स्वत:हून टोकन नंबर घेणे अपेक्षित होते. अनेक रिक्षाचालकांनी टोकन नंबर घेतलेला नाही. प्रवाशांचा सुरक्षिततेसाठी परमीट रिक्षाचालकांच्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम अाहे. नंबर घेण्यास टाळाटाळ केल्यास संयुक्तपणे कारवाई करू. याशिवाय पोलिस अायुक्तांसोबत या मोहिमेबाबत चर्चा करतो. बजरंगखारमाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी