आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौशल्य विकास योजनेतून प्रशिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पंतप्रधानकौशल्य विकास योजनेतून सोलापूरच्या यंत्रमाग कामगारांना प्रशिक्षण देणार असल्याची माहिती टेक्स्टाइल सेक्टर स्कील कौन्सिल (टीएससी)च्या संचालक डॉ. स्वप्ना मिश्रा यांनी दिली. अक्कलकोट रस्त्यावरील आैद्योगिक वसाहतीत यंत्रमागधारक संघाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कौशल्य विकास योजनेची सविस्तर माहिती देताना त्या म्हणाल्या, “युवकांना रोजगार मार्गदर्शन करण्यासाठी कौशल्य विकास योजना आणली. ती केंद्राच्या नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कौन्सिल (एनएसडीसी)च्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे.
चालू आर्थिक वर्षात देशभरातील २४ लाख कामगारांना प्रशिक्षण देण्याचे ठरवले. त्यात यंत्रमाग कामगारांचाही समावेश करण्यात आला. तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी १३ कोटी लाख रुपये मंजूर झाले. हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या कामगाराला प्रत्येकी १० हजार रुपयांचे विद्यावेतन देण्यात येईल.”

या योजनेत सहभागी होण्यासाठी कारखानदारांनी कौशल्य विकास योजनेच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले. अधिक माहितीसाठी तानाजी गावडे (९०११०१०१७५), विजय गावडे (९८२१२५७१२७) यांच्याशी संपर्क साधावा.

या वेळी संघाचे प्रेसिडेंट माजी खासदार धर्मण्णा सादूल, नरसय्या वडनाल, अंबादास बिंगी, बाळू घनाते, विश्वनाथ मेरगू, बालाजी सामलेटी, नामदेव केंदोळे, बिट्रा सोलापूरचे अमर पाटील आदी उपस्थित होते.तसेच यंत्रमाग कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...