आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Skills Development: Appeal Self Employment Training For Young People

कौशल्य विकास; युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षणाबाबत आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळावी या हेतूने जिल्हा कौशल्य विकास समितीअंतर्गत जिल्ह्यातील युवक- युवतींसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये ब्युटी थेरपी, रेडिमेड गारमेंट, फॅशन डिझायनिंग, मेक-अप, हेअर स्टाइल, वूडन फर्निचर, फॅब्रिकेशन, ग्रीन हाऊस, शेडनेट, पॉलीहाऊस, हॉस्पिटॅलिटी इव्हेंट मॅनेजमेंट यासारखे एकूण १८ कोर्सेस याबाबत महिना कालावधीचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणासाठी मुलाखतीद्वारे निवड होणार असून सहभागी उमेदवारांना हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी अधिक माहितीसाठी दिनांक ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा उद्योग केंद्र या ठिकाणी संपर्क साधावा. www.solapur.gov.in / www.mced.nic.in www.solapurnic.co.in या संकेत स्थळावरून इच्छुकांनी वरील अर्ज प्राप्त करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर यांनी केले आहे.