आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशाहीऐवजी गुलामीचे डीएनए अधिक घट्ट रुजले...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - हजारोवर्ष गुलामी सहन केलेल्या भारतीयांमध्ये लोकशाही व्यवस्था रुजावयाची असेल तर या देशाचा मी मालक आहे, ही भावना रुजणे गरजेचे आहे. याऐवजी गुलामीचे डीएनएच रुजलेले दिसून येतात. हा रस्ता माझ्या मालकीचा, ही रेल्वे, ही एस. टी. माझ्या मालकीचे आहेत, त्याचे नुकसान मी करणार नाही, अशी भावना म्हणूनच दिसून येत नाही, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी आज येथे केले.

उद्योग बँकेतर्फे फडकुले सभागृहात आयोजित गणेशोत्सव व्याख्यानमालांतर्गत श्री. कांबळे यांनी भारतीय लोकशाही, राजकारण, दिशा याबाबत विचार मांडले. श्री. कांबळे म्हणाले, खरेतर भारत वगळता जगातील इतर देशातील राज्यघटना या राजा, महाराणी, प्रेषित, प्रभू, अल्ला यांना अर्पित असल्याचे दिसून येते. मात्र वुई पीपल ऑफ इंडिया असे म्हणून आपण आपली राज्यघटना स्वत:लाच अर्पण केलीय. असे असले तरी आपल्या जगण्यात, वागण्यात, विचारात हा माझा देश आहे असे कोठे आहे? जोपर्यंत आपण मालक आहोत, असे समजणार नाही तोपर्यंत भ्रष्टाचार संपणार नाही.

स्वातंत्र्य , समता , बंधुता साकारण्यासाठी त्या दृष्टीने विचार करणारे नागरिक लोकशाहीच्या या प्रक्रियेतून घडत असल्याचे दिसून येत नाही. सकाळी एकाने अखिल भारतीय म्हणून एखादा पक्ष काढायचा, दुपारी कोणत्यातरी पक्षाशी युती करायची, सायंकाळी त्या पक्षात त्याचे विलिनीकरण करून टाकायचे, अशी लोकशाही विकासाच्या दृष्टीने कशी कार्य करेल?
उद्योग बँकेतर्फे फडकुले सभागृहात आयोजित गणेशोत्सव व्याख्यानमालेत उपस्थित असलेला श्रोता वर्ग.

२९ हजार ९०० जाती
भारतातसुमारे पाच हजार जाती आणि तब्बल २४ हजारांपेक्षा जास्त उपजाती आहेत. या प्रत्येक जातीतील किमान एकाला तरी भारतीय संसदेत प्रतिनिधीत्व मिळते का ? नाही. फक्त १०० प्रमुख जातीला, इतर २९ हजार ९०० जातींच्या वतीने राज्यकारभार करण्याची संधी मिळते. उर्वरित जातींना संसदेत प्रतिनिधीत्वच मिळत नाही.

३७ टक्के वंशपरंपरा
स्वातंत्र्यानंतरराज्यकर्ते म्हणून त्याच त्या घरातील व्यक्ती दिसून येतात. याचे प्रमाण ६७ टक्के इतके आहे. काँग्रेसमध्येच नाही तर पुरोगामी, डावे अशा सर्वच पक्षात िवचारधारेत होत असल्याचे दिसून येईल. ४० टक्के नवीन पिढी राजकारणात येत असली तरी ३७ टक्के हे वंशपरंपरा चालवणारेच असतात.

राजकारणातून दंगली
भारतातजातीय दंगल, खलिस्तानचे राजकारण, नक्षलवादी चळवळीचे राजकारण आणि १९९० नंतर जिदाही दहशतवाद या साऱ्या घटना राजकारणातन घडत गेल्या. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या दंगली असो की तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये देशात उसळलेल्या दंगली असो, या साऱ्या राजकीय हेतूने प्रेरित होत, असे भंडारी यांनी सांगितले.

निर्वासितांचे लोंढे
सिरियातमाजलेल्या हिंसाचारामुळे लाखो नागरिक निर्वासीत म्हणून युरोप खंडाकडे धाव घेत आहे. अशीच स्थिती भारत स्वतंत्र झाल्यानंतर काश्मिरी पंडितांविषयी घडली होती. काश्मीरमधील फुटीरतावादी लोकांमुळे काश्मिरातील सात लाख काश्मिरी पंडितांचा वंश विच्छेद झाला. हा दहशतवादच होता.