आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटी; मनपाला हवी चीनची मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्मार्टसिटी योजनेअंतर्गत शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी शुद्ध करण्यासाठी चीनची मदत घेण्याची महापालिकेची इच्छा आहे. याबाबत सोमवारी सकाळी बालाजी सरोवर येथे चीनच्या पथसोबत बैठक झाली. यावेळी चीनचे काॅन्सिल आॅफ जनरल झँग झुआँग यांच्यासह १२ जणांचे पथक, महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, जलवितरण तज्ज्ञ राजेंद्र होलाणी, एनटीपीसीचे महाप्रबंधक राॅय यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते. चर्चा सकारात्मक झाली पण त्याबाबत शासन पातळीवर निर्णय होणे अपेक्षित आहे, असे महापालिका आयुक्त काळम-पाटील यांनी सांगितले.
शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका आराखडा तयार करत असून, ते चीनच्या पथकास दाखवण्यात आले. त्यावर सकारात्मक भूमिका घेतल्याचे चीनचे काैन्सिल आॅन जनरल झुआँग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सोलापुरात उसाचे क्षेत्र कारखाने जास्त असून, उसाच्या रसापासून पदार्थ तयार करण्यास मदत करण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे, असे झुआँग यांनी सांगितले.

महापालिकेत सत्कार
चीनच्या पथकातील ११ सदस्यांचा सत्कार महापालिकेच्या वतीने करण्यात आले. त्यांचे स्वागत महापौर सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, स्थायी समिती सभापती पद्माकर काळे यांनी केले. त्यांचे स्वागत रांगोळी काढून, औक्षण करून करण्यात आले. यावेळी महापौर आबुटे यांनी भगिनी करार पूर्ण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींमुळे बंधुभाव वाढला
चीनचे काॅन्सिल आॅफ जनरल हे महापौर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले, डाॅ. द्वारकानाथ कोटणीस यांनी आम्हाला एक नवीन इतिहास घडवून दाखवला आहे. सोलापुरातील बैठक भारत-चीन मैत्री पुढे नेण्यासाठी आहे. स्मार्ट सिटीत एकमेकांना सोबत घेऊन जाण्यासाठी आम्ही इच्छूक आहोत. सोलापुरात उसाचे उत्पादन आणि साखर कारखाने आहेत. त्यामुळे उसाच्या रसापासून पदार्थ तयार करण्यासाठी आमच्याकडे कल्पना आहेत, त्या साकार करण्याचा प्रयत्न करू. भगिनी शहराचे करार झाले असून, ते पुढे नेण्याचा हा एक भाग आहे. मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्रला आमचा पाठिंबा आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारत-चीन बंधूभाव वाढला.

भगिनी कराराचे काय?
चीनचे पथक अनेकवेळा येऊन गेले. दरवेळी भगिनी शहर कराराबाबत चर्चा झाली, पण त्याची अंमलबजावणी झालीच नाही.

कोटणीस स्मारक भेट
चीनचे पथकाने बुधवारी सायंकाळी डाॅ. कोटणीस स्मारकाला भेट दिली तेथील माहिती जाणून घेतली. यावेळी नगरसेवक चेतन नरोटे, दिलीप कोल्हे, कल्पना यादव, माजी खासदार धर्मण्णा सादूल, डाॅ. वळसंगकर, काॅ. रवींद्र मोकाशी, प्रा. ऋतुराज बुवा, विजय मोहिते, श्वेता कोठावळे उपस्थित होते.