आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्र जागून "स्मार्ट सिटी'चा आराखडा तयार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - केंद्राच्यास्मार्ट सिटीवरून राज्यात स्मार्ट राजकारण सुरू असताना सोलापुरात मात्र महापालिका आयुक्तांच्या घरात स्मार्ट सिटी आराखडा तयार करण्यासाठी जागरण सुरू होत. सोमवारी रात्रभर स्मार्ट सिटी आराखड्यावर अखेरचा हात फिरवला जात होता. पहाटे सहाय्यक आयुक्त अमिता दगडे-पाटील तो आराखडा घेऊन दिल्लीला रवाना झाल्या. मंगळवारी केंद्राकडे हा आराखडा सादर केला जाणार आहे.
स्मार्ट सिटी योजनेमुळे सिद्धेश्वर मंदिर परिसरसह गावठाण भागाचा विकास होणार आहे. शहर पाणीपुरवठा कचरा प्रश्नावर तोडगा शोधण्यात आला आहे. वर्गात सोलापूर आणि अमरावती महापालिकेचा समावेश आहे. या योजनेत महापालिकेसाठी ५० कोटींची तरतूद आहे. ती तरतूद कशी करणार याचा उल्लेख आराखड्यात असणे आवश्यक आहे. सोलापूर महापालिकेने तो उल्लेख आराखड्यात केला आहे. तसेच आर्थिक मदतकरण्यास काही संस्था पुढे आल्याचे मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी सांगितले.

यापरिसराचा होणार विकास :सिद्धेश्वर मंदिर परिसर, शाहाजहूर दर्गा, रेल्वे स्टेशन, डाॅ. कोटणीस स्मारक, शासकीय कार्यालये. होम मैदान, सिद्धेश्वर पेठ, चार पुतळा परिसर आदी चार लाख लोकवस्तीच्या भागाचा समावेश आहे.

आयुक्तांच्या घरी जागरण
स्मार्ट सिटी आराखडा केंद्र सरकारकडे १५ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सादर करण्याची मुदत आहे. महापालिकेने १४ डिसेंबरपर्यंत त्यात सुधारणा करून शक्य तितके नवीन मुद्दे उपस्थित करून केंद्र सरकडे नावीण्यपूर्ण योजना सादर करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सोमवारी रात्री महापालिका आयुक्तांच्या घरी जागरण करून आराखड्यास अंतिम स्वरूप देण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त काळम-पाटीलसह सुमारे ५० अधिकाऱ्यांचा ताफा होता.

पहिल्या टप्प्यात येण्यासारखा आराखडा तयार केला
^स्मार्टसिटी आराखडा तयार करताना नवीन आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत नवीन बदल करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी रात्रभर बसून आराखडा तयार केला. तो मंगळवारी दिल्ली केंद्राकडे सादर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सोलापूर बसेल.'' विजयकुमार काळम-पाटील, मनपाआयुक्त
स्मार्ट सिटीच्या आराखड्यावर अखेरचा हात फिरवताना महापालिका आयुक्त विजयकुमार काळम पाटील, अमिता दगडे पाटील, अनुस डॉन, चलवादी, दत्तात्रय चौगुले, प्रा. नरेंद्र काटीकर, तर्पन डंके, प्रा. हिंदुराव गोरे, मतीन सय्यद, शैलेश बच्चुवार आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...