आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीवरून महापौरांची कोंडी, राजीनाम्याची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्मार्टसिटी योजनेसाठी महापालिकेचा ठराव वेळेत झाल्याने राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे यांनी महापौर सुशीला आबुटे यांना जबाबदार धरले तर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी "झाले ते चुकीचेच होते' असे म्हटले. मनपात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने आणि स्वपक्षीय आमदार यांनी घेतलेल्या भूमिकेने महापौर आबुटे या एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच विरोधी बाकावरील भारतीय जनता पक्षाने महापौरांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने राजकारण रंगले आहे.

ठराव वेळेत झाल्याच्या प्रकाराला महापौर जबाबदार आहेत, काँग्रेसने त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपने केली. स्मार्ट सिटीत आडकाठी आणणार नाही, असे स्पष्टीकरण करण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे.

काय आहे प्रकरण
राज्यातीलशहरांना ‘स्मार्ट’ बनवण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यासाठी महापालिकांनी ठराव करून द्यावेत, असे पत्र महापालिकांना दिले होते. ते आयुक्त काळम-पाटील यांनी जुलै रोजी पाठवून दिले. १० जुलैपूर्वी एकमताने ठराव व्हायला हवा होता, पण तो झाला नाही. आता १४ जुलै रोजी सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे. त्यात यावर चर्चा होणार आहे. दरम्यान, महापौरांनी आयुक्तांना पत्र देऊन एकमताने ठराव करण्याची हमी १० जुलै रोजी दिली आहे.
झारीतील शुक्राचार्यांचा

राजीनामा घ्या
माजीगृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शेतक-यांच्या प्रश्नावर मोर्चा काढला, शहर विकासाची त्यांची तळमळ बघून शहरवासीयांनाही बरे वाटले. परंतु त्यांच्याच पक्षाच्या महापौरांना आणि पक्षनेत्यांना हे शहर स्मार्ट सिटीत समाविष्ट व्हावे असे वाटत नाही. ते जाणीवपूर्वक चालढकल करतात. यामागे केवळ त्यांना राजकारण करावयाचे आहे. शहर विकासाच्या आड येणा-या झारीतील शुक्राचार्यांना पदावरून दूर करावे.'' प्रा.अशोक निंबर्गी, शहराध्यक्ष, भाजप
काँग्रेसने शेतक-यांच्या प्रश्नावर मोर्चा काढून मोदी फडणवीस सरकारला धारेवर धरले होते. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी पत्रक काढून काँग्रेसला ‘स्मार्ट’सिटीचा ठराव वेळेत केल्याने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणात आडकाठी आणण्याची कोणतीच भूमिका काँग्रेसची नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आता १४ जुलै रोजी होणा-या सर्वसाधारण सभेत या प्रकरणी निषेध करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे.

जे झाले ते चुकीचेच, लगेच ठराव करून घेऊ
पालकमंत्री विजय देशमुख यांच्याबरोबर याविषयी बोलणे झाले आहे. स्मार्ट सिटी विषयात राजकारण आणून शहराच्या विकासात आडकाठी आणण्याची काँग्रेसची भूमिका नाही. जे झाले ते चुकीचेच होते. लगेच स्मार्ट सिटीसाठीचा ठराव करून घेऊ. पाण्यासंदर्भात आपण हीच भूमिका घेऊया. लोकांना वेठीस धरता लोकांना १४ जुलैपर्यंत पाणी देऊया, अशी विनंती पालकमंत्र्यांना केली. त्यावर पाणी सोडण्याचे आश्वासन त्यांनी दिले.'' प्रणितीशिंदे, आमदार, शहर मध्य