आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, स्टेशन, स्टेडियम सुंदर करण्यास प्राधान्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत शहरातील १०४२ एकर परिसराचा विकास होणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी आराखडा १५ दिवसांत करण्यात येणार आहे. यात सिद्धेश्वर मंदिर परिसर, भुईकोट किल्ला, इंदिरा गांधी स्टेडियम, रेल्वे स्टेशन सौंदर्यीकरण याशिवाय साऊंड लाइट शो या कामांचा त्यात समावेश असणार आहे. भुईकोट किल्ल्याचा विकास तेथे मार्निंग वाॅक करण्यासाठी ट्रॅक तयार करणे या कामाचा समावेश असणार आहे. भुईकोट किल्ल्याचे अभ्यास केलेले डाॅ. सुधीर चव्हाण यांनी किल्ल्यात विकास शक्य आहे. त्याबाबत त्यांनी कंपनीच्या संचालक मंडळासमोर प्रेझेंटेशन सादरीकरण केले. त्याचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात येईल, असे कंपनीचे चेअरमन मिलिंद म्हैसकर यांनी सांगितले.
किल्ला परिसर सुशोभीकरण करणे शक्य
स्मार्ट सिटी योजनेत किल्ला आणि सिद्धेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यासाठी सुमारे ९३ कोटींची तरतूद केली. त्यापेक्षा कमी रक्कमेत जलदगतीने वर्षाच्या आत काम करणे शक्य आहे. तेथे बांधकाम तयार आहे. तटबंदी परिसरात दोन किमी अंतराचे वाॅकिंग ट्रॅक करणे शक्य आहे. वर्षाच्या आत काम होईल. तेथे पर्यटकांची संख्या वाढेल. शहरातील नागरिकांना फिरण्यासाठी निसर्गरम्य ठिकाण होईल, असे डाॅ. चव्हाण यांनी सांगितले.

यांची होती बैठकीस उपस्थिती : महापौरसुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी, सभागृह नेतेे संजय हेमगड्डी, विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, जिल्हाधिकारी रणजित कुमार, महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, सहाय्यक आयुक्त अमिता दगडे-पाटील, अप्पर सचिव नगररचना अजित कवडे, क्रिसील कंपनीचे पार्थिव सोनी, प्राचार्य सुधीर चव्हाण, राहुल कुलकर्णी, सीए गावडे.

सौंदर्यात भर पडेल
किल्ला परिसराचे सुशोभीकरण करून, तटबंदीस माॅर्निंग वाॅक करण्यासाठी ट्रॅक केल्यास सर्वात सुंदर असे प्रेक्षणीय स्थळ होणार आहे. यासाठी खर्च जास्त येणार नाही. तेथे बागेचा विकास केल्यास स्मार्ट सिटीचा आत्मा बनू शकेल. किल्ला परिसरात तलाव, सिद्धेश्वर मंदिर, बाग, स्टेडियम आणि शहराचा विकासाचा भाग असल्याने शहराच्या सौंदर्यात भर घालणारे स्थळ ठरणार आहे.

म्हैसकर यांची बागेस भेट
स्मार्ट सिटी कंपनीचे चेअरमन मिलिंद म्हैसकर यांनी शुक्रवारी दुपारी दोन वाजता किल्ला बागेस भेट देऊन पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, जिल्हाधिकारी रणजित कुमार, उपअभियंता शांताराम अवताडे आदी उपस्थित होते.

‘दिव्य मराठी’तील वृत्त पाहून कल्पनेस वाव
किल्ला परिसराचा विकास कसा होऊ शकतो यांची कल्पना किल्ल्याचे अभ्यासक डाॅ. सुधीर चव्हाण यांनी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्यासमोर मांडली. त्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’त प्रकाशित केले. ते कंपनीचे चेअरमन मिलिंद म्हैसकर यांनी पाहिले. कल्पनेस वाव मिळाला.

बैठकीतील निर्णय
Áबांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे यांचा राजीनामा मंजूर
Áमिलिंद म्हैसकर यांची चेअरमन म्हणून निवड
Áलोगो निश्चित केले
Áसह्याद्री शाॅपिंग सेंटर येथे कंपनीचे कार्यालय सुरू करण्यास मान्यता

स्मार्ट सिटी बैठकीत माहिती देताना डॉ. सुधीर चव्हाण. सोबत कंपनीचे चेअरमन मिलिंद म्हैसकर, आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, जिल्हाधिकारी रणजित कुमार आदी.
भागधारकांची बैठक संपल्यानंतर उपमहापौर प्रवीण डोंगरे तेथेच बसले. कंपनीचे संचालक नसताना डोंगरे हे संचालक मंडळाच्या बैठकीस उपस्थित होते. त्यांची घुसखोरी दिसली आणि बैठकीत त्यांनी सूचनाही केल्या.
बातम्या आणखी आहेत...