आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज स्मार्ट सिटीची मुहूर्तमेढ, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - केंद्रसरकारची महत्त्वाची योजना असलेली स्मार्ट सिटी शनिवारपासून सुरू होत आहे. त्यासाठी २२३६ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरवासीयांच्या स्वप्नाचा आज मुहूर्तमेढ रोवण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. सकाळी किल्ला बाग येथे बाग सुशोभीकरणचा शुभारंभ तर सायंकाळी चार वाजता शिवछत्रपती रंगभवन येथे कार्यक्रम होणार आहे.
देशातील २० शहरात स्मार्ट सिटी योजना राबवण्यात येणार आहे. योजनेचा शुभारंभ पुण्यातून सायंकाळी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. २० शहरांत सोलापूरचा समावेश आहे. पुण्यातून व्हिडीओ काॅन्फरसद्वारे सोलापुरातील योजनेचा शुभारंभ होणार आहे. त्यासाठी आवश्यक ती अंतिम चाचणी शुक्रवारी घेतली.

सेनेवरील टीकेचे निमित्त
भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शिवसेनेवर टीका केल्याच्या निषेधार्थ स्मार्ट सिटी शुभारंभ कार्यक्रमावर शिवसेनेने बहिष्कार टाकला आहे. त्याबाबतचे आदेश शिवसैनिकांना देण्यात आल्याची माहिती शहरप्रमुख प्रताप चव्हाण यांनी दिली. आंदोलन करण्याबाबत काय भूमिका घेणार हे शनिवारी सकाळी निश्चित हाेईल, असे चव्हाण म्हणाले.
स्मार्ट सिटी योजनेच्या उद््घाटन कार्यक्रमास भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व पक्षांचे कार्यकर्ते येणार आहेत. त्यासाठी सर्व पक्षातील नेते, सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, उद्योगपती, उच्च शिक्षित व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमावर शिवसेनेने बहिष्कार टाकला आहे.
२० शहरांचे करण्यात येईल सादरीकरण
१७स्मार्ट शहरांचे प्रेझेंटेशन (सादरीकरण) दुपारी तीनपासून केंद्रीय कार्यालयातून दाखवण्यात येणार आहे. पुणे येथे पंतप्रधान यांच्या उपस्थितीत तीन शहरांचे सादरीकरण दाखवण्यात येईल. दुपारी तीन तेे ३.४५ पर्यंत सादरीकरण दाखवण्यात येतील.

अडीचपासून रंगभवन येथे मिळेल प्रवेश
श्री शिवछत्रपती रंगभवन येथे नागरिकांना दुपारी अडीचपासून प्रवेश देण्यात येणार आहे. पुढे व्हीआयपी असतील. त्यानंतर नगरसेवक, विशेष निमंत्रित, नागरिक अशी क्रमवारी असेल.

केंद्रीय पथकाकडून दोन्ही ठिकाणी पाहणी
किल्ला बाग आणि रंगभवन येथील कार्यक्रम स्थळांची पाहणी केंद्रीय नगरविकास खात्याचे उपसचिव पी. सी. दसमाना यांनी केली. यावेळी आयुक्त काळम-पाटील उपस्थित होते.

काय आहे योजना
कचरा व्यवस्थापन करणे, पायाभूत सुविधा देणे, सायकल ट्रॅक करणे, शहर स्वच्छ ठेवणे, वाहतूक, पाणीपुरवठा, पाणी वितरण, सार्वजनिक ठिकाणांचा वापर करणे, लाईट शो, सिद्धेश्वर तलाव सुशोभीकरण, नाईट मार्केट सोयी करणे. यासाठी २२४७ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरातील गावठाण भागातील १०४२ एकर परिसरात सुविधा देण्यात येणार आहे.

किल्लाबाग
केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत किल्ला बागेचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. महापौर सुशीला आबुटे यांच्या हस्ते, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. बागेत ५०० नागरिक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

सर्वोच्च आनंदी क्षण
^स्मार्टसिटी योजनेचा शुभारंभ माझ्या शासकीय नोकरीतील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. शुभारंभ कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. त्यासाठी शुक्रवारी प्रात्यक्षिक घेण्यात आले. विजयकुमारकाळम-पाटील, मनपा आयुक्त

खासदारांनादिले विशेष निमंत्रण
सोलापूर जिल्ह्यातील खासदारांना स्मार्ट सिटी शुभारंभाच्या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रण देण्याची सूचना केंद्रीय नगरविकास खात्याकडून आली होती. त्यानुसार महापालिकेच्या वतीने खासदार अॅड. शरद बनसोडे, खासदार विजयसिंह मोहिते आणि खासदार रवींद्र गायकवाड यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...