आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मार्ट सिटीच्या दोन संचालक नियुक्तीचा प्रस्ताव पुन्हा सभेकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरसिटी डेव्हलपमेंट कंपनीसाठी दोन संचालकांची नावे द्या, असा प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेकडे कंपनीने पाठवला आहे. २० आॅगस्ट रोजी होणाऱ्या सभेपुढे चर्चेसाठी विषय असणार आहे.
स्मार्ट सिटी जाहीर होऊन सात महिने झाले. त्याच्या कामाचा शुभारंभ २५ जून रोजी झाला. प्रत्यक्षात काम सुरू झाले नाही. शिवाय, याच्या प्रकल्प सल्लागार एजन्सीचे नावही निश्चित झाले नाही. दुसरीकडे स्मार्ट सिटी कंपनीचे कार्यालय सह्याद्री शाॅपिंग सेंटर येथे सुरू करण्यात आले. काम केले पण ते कार्यालय बंद आहे. स्मार्ट सिटीच्या कामाबाबत महापौर सुशीला आबुटे यांनी नाराजी व्यक्त केली. दोन वेळा कंपनीचे सीईओ बदलले. उद््घाटन होऊन दोन महिने झाले काम सुरू नाही, अशी टीका आबुटे यांनी केली.

संचालक मंडळात सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींना संधी मिळावी म्हणून महापालिका पदाधिकारी वगळता उतरत्या क्रमाने लोकप्रतिनिधी असलेल्या राजकीय पक्षातील दोन संचालकांची नावे महापालिका सभागृहाने द्यावी असा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव यापूर्वीही आला होता. त्यावर सभागृहाने पूर्वीचा ठराव पाठवला. तो कंपनीने अमान्य केला. राष्ट्रवादी शिवसेना संधी मिळू शकते. राष्ट्रवादीचे प्रवीण डोंगरे शिवसेनेचे महेश कोठे यांच्या नावांची उपसूचना विरोधकांची आहे. सत्ताधारी अन्य नावाचा विचार करण्याची शक्यता आहे.

मनपाने ५० कोटी दिले नाहीत
स्मार्ट सिटीसाठी महापालिकेचा हिस्सा म्हणून दरवर्षी ५० कोटी भरणे आवश्यक आहे. शासनाने पहिला हप्ता दिला, पण मनपाने ५० कोटी अद्याप कंपनीकडे जमा केले नाहीत.
बातम्या आणखी आहेत...