आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटी योजनेच्या प्रत्यक्ष कामाला येत्या सहा महिन्यांत सुरुवात होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्मार्टसिटी योजनेच्या कामास सहा महिन्यांत सुरुवात होईल. तसेच नियुक्त क्रिसील कंपनीचे टेंडरिंग दर जास्त असले तरी आंतरराष्ट्रीय बिडींगनुसार ८४.९३ इतके गुणांकन मिळाल्याने ही नियुक्ती झाली असल्याची माहिती अध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी सोमवारी दिली.
महापालिकेतील अायुक्तांच्या कक्षात सोमवारी दुपारी साडेतीन वाजता स्मार्ट सिटीसंदर्भात बैठक झाली. यावेळी महापौर सुशीला आबुटे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, अधिकारी श्रीकांत मायकलवार, संजय तेली, प्रकाश भुकटे, पी. सी. धसमाना आदींची उपस्थिती होती.

श्री. म्हैसकर म्हणाले की, सीईओ पीएमसी यांची नियुक्ती नसल्याने स्मार्ट सिटीचे काम सुरू होत नव्हते. दर्जा आणि अवमूल्यन या गोष्टीवर कंपनीस हे काम सोपविण्यात आले आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी हजार २०० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. आजच्या बैठकीत विविध साधकबाधक गोष्टींवर चर्चा झाली. या विकासकामात प्रथमतः सिद्धेश्वर तलाव, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक, किल्ला आदींमध्येही सुधारणा करण्यात येणार आहे. शहराच्या विविध भागात मंदिर परिसरात अद्ययावत स्वच्छतागृहांची सोय ही करण्यात येणार आहेत. पीएमसी सीईओ मिळून या योजना राबविणार आहेत. या महत्त्वाच्या कामाचा पाया पूर्ण झाला. २८३ कोटी रुपये पहिल्या टप्प्यात आले असून ते कसे खर्च करावेत? यावरच ही चर्चा होती. दर महिन्याला महापौर, विरोधी पक्षनेते, ज्या विभागात प्रकल्प राबविण्यात येणार आहे, त्या ठिकाणी नियुक्त अधिकाऱ्यांशी बैठक होईल. तसेच इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून प्रा. नरेंद्र काटीकर चंद्रशेखर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. हे सर्व प्रकल्प मोठे असून यात पारदर्शकता अाणण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...