आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आकाराला येतंय स्मार्ट रेल्वे स्थानक, पोर्च उभारणी सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर पोर्च उभारण्यात येत आहे. यासाठी ५० टन लोखंडाचा वापर करण्यात येणार आहे. प्रवाशांना सोडण्यास येणाऱ्या वाहनांसाठी ड्राॅप अॅन्ड गो ही सुविधा असेल.पोर्च उभारल्यानंतर स्मार्ट सोलापूरचे स्थानकही स्मार्ट ठरणार आहे.
पोर्चचा आराखडा पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगकडे पाठवला. काॅलेजने सुधारणा सुचवल्यानंतर पोर्चच्या कामाला शुक्रवारपासून सुरुवात केली.

स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर छोट्या पोर्चवर लाेखंडी अंॅगलचा ढाचा उभारण्याचे काम सुरू झाले आहे. हा ढाचा सुमारे टन ८० किलो वजनाचा आहे. पोर्चच्या अात एलइडीचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी स्थानक उजळून निघेल. पोर्चचे काम सोलापुरातील ओम कन्स्ट्रक्शनला दिले आहे. यासाठी एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे कन्स्ट्रक्शनचे सागर पुकाळे यांनी सांगितले.

सध्याचे स्थानक
^ऑक्टोबर पर्यंतपोर्च बनवण्याचे काम पूर्ण होईल. पोर्चमुळे रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यात भर पडेल. प्रवेशद्वाराच्या वैभवामध्ये भर पडेल. या कामासाठी सुमारे ८० लाख रुपये खर्च येईल. मनिंदरसिंगउप्पल, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर
रेल्वे स्थानकाच्या उजव्या बाजूला पूर्वी दुचाकींसाठी वाहनतळ होते. आता हे वाहनतळ जुन्या मालधक्क्यात स्थलांतरित केले आहे. सध्या स्थानकाच्या प्रवेशद्वारसमोर रिक्षा थांबा आहे. तो जुन्या वाहनतळाच्या जागेत हलवण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...