आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघातात मोडलेले घर उभे राहिले, महानंदा मुळे यांना मिळाला निवारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - समाजधावून आला. मदतीचे अनेक हात पुढे आले आणि बघता बघता ५५ दिवसांत एका असहाय्य माऊलीचे मोडून पडलेले घर पुन्हा उभे राहिले. माता चिमुकल्यांसह आपल्या गोजिरवाण्या घरात परतली. हा सुखद सोहळा रविवारी अनेकांनी अनुभवला. देण्याचे सुख अनेकांनी अनुभवले.
जुना बोरामणी नाका परिसरात महानंदा मुळे अापल्या दोन चिमुकल्यांसह राहतात. धुणी-भांडी करून संसाराचा गाडा हाकत असतानाच नऊ मे २०१६च्या पहाटे ट्रक-टेम्पो अपघातात त्यांचे पत्र्यांचे घर उद््ध्वस्त झाले. त्यातल्या त्यात दिलासा दिणारी गोष्ट म्हणजे या जीवघेण्या अपघातातून कुटुंब बचावले. अपघातानंतर चिमुरडा शुभम अाईला बिलगून विचारू लागला. ‘आई गं... अापलं घर पडलं... अाता अापण राहायचं कुठं...’ दोन दिवस फूटपाथवर राहावे लागले.
यालोकांनी केली मदत : एकाव्यक्तीने संपूर्ण घर बांधून दिले. याशिवाय उद्योजक बाबूभाई मेहता यांनी पाच हजारांची मदत मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलला. नगरसेविका इंदिरा कुडक्याल यांनी पत्रे आणि वाशे दिले. याशिवाय महानंदा यांच्या मैत्रिणीने कपडे धान्य दिले. मुलाच्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, ज्ञात अज्ञात लोकांनी कपडे, पैसे, धान्य, खाऊ असे येन-केन प्रकारे मदत केली. अॅड. प्रशांत नवगिरे यांनी अपघात विमा मिळवून देण्यासाठी मोफत वकीलपत्र घेतले अाहे.

महापालिकेची मदत मात्र अद्याप मिळालेली नाही. संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान सुरू झाले नाही. ‘दिव्य मराठी’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक जण मदतीसाठी धावून अाले, हे सुखद आहे.

चिमुकला शुभम म्हणाला, अाई गं... अापलं घर उभं राहिलं
‘दिव्य मराठी’ने हे वृत्त प्रकाशित करून समाजाला मदतीचे आवाहन केले. नेहमीप्रमाणे समाजातील मोठ्या मनाची माणसे पुढे आली आणि ५५ दिवसांत घर उभे राहिले. रविवारी महानंदा मुळे यांनी छोटीशी पूजा मांडून गृहप्रवेश केला. चिमुकला शुभम अापसूकच अाईला म्हणाला, अाई गं... अापलं घर उभं राहिलं... आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळून गेले.
अशी कोसळली होती आपत्ती
श्रीमतीमहानंदा यांचे पती प्रशांत यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. शुभम प्रथमेश या दोन मुलांना घेऊन त्या जुना बोरामणी नाका चौकात राहतात. अपघातात ट्रक घरात घुसल्यामुळे पूर्ण घरच पडले होते. यात महानंदा प्रथमेश हे दोघेजण जखमी झाले होते. हा परिवार पूर्णपणे रस्त्यावर अाला होता. दोन रात्र दोन मुलांना घेऊन त्या पडलेल्या घरासमोरील फूटपथावर काढले. एके दिवशी तर प्रथमेश पावसात पूर्णपणे भिजला होता. यानंतर याच भागातील एका व्यक्तीने अापले पत्र्याचे घर त्यांना राहायाला दिले. मोडक्या संसाराला थोडासा अाधार मिळाला. पण, मनात अाजून धाकधूक होती की, घर बांधायचे कसे, मुलांचा सांभाळ कसा करायचा, शिक्षण कसे द्यायचे?

मदतीची उतराई कधीच करू शकणार नाही
एकादानशूर व्यक्तीने महानंदा मुळे यांचे संपूर्ण घर बांधून दिले अाहे. त्यांनी नाव छापण्याची अट घातली अाहे. ‘दिव्य मराठी’शी संवाद करताना महानंदा मुळे म्हणाल्या, ‘सद््गुरू कृपेमुळे अाज माझं घर उभे राहिले. देवच मदतीला धावून अाला. अनेक लोकांनी मदत केली. या सर्वांची उतराई मी कधीच करू शकणार नाही. समाजातील मोठ्या मनाच्या लोकांनी माझ्या लेकरांना निवारा दिला.’ आपली भावना सांगताना श्रीमती महानंदा मुळे यांना रडू अावरले नाही. यावेळी मुलगा प्रथमेश शुभम अाई ललिता गुगलगावे सोबत होत्या.
बातम्या आणखी आहेत...