आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूरच्या वळसंगजवळ अपघात; ठार, गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वळसंगते तोगराळी या गावादरम्यान दुचाकीला वाहनाची धडक बसल्यामुळे दोघेजण गंभीर जखमी होऊन मृत्यू पावले. हा अपघात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमाराला अक्कलकोट रस्त्यावरील वळसंगजवळ घडला. प्रकाश अंबादास कांबळे (वय २३), सिद्राम हुळ्ळे (वय ३५, रा. दोघे सिद्धरामेश्वर नगर, अाकाशवाणी केंद्राजवळ) यांचा मृत्यू झाला. चिदानंद बाबूराव चाबुस्कवार (वय ३५, रा. अाकाशवाणी केंद्राजवळ) हा गंभीर जखमी असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरू अाहेत.

उसाचे वाडे घेण्यासाठी तिघेजण दुचाकीवरून दुपारी वळसंगला गेले होते. परतताना समोरून येणाऱ्या वाहनाची जोरदार धडक बसली. अपघातानंतर वाहनचालक तसाच निघून गेला. नागरिक पोलिसांनी मिळून जखमींना सोलापुरात अाणले. कांबळे हुळ्ळे यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात अाले. प्रकाश हा टेम्पो चालक म्हणून काम करीत होता. त्याच्या मागे अाई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार अाहे. हुळ्ळे हा बिगारीचे काम करीत होता. पत्नी, एक मुलगा असा परिवार अाहे.

सोलापूर वळसंगते तोगराळी या गावादरम्यान दुचाकीला वाहनाची धडक बसल्यामुळे दोघेजण गंभीर जखमी होऊन मृत्यू पावले. हा अपघात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमाराला अक्कलकोट रस्त्यावरील वळसंगजवळ घडला. प्रकाश अंबादास कांबळे (वय २३), सिद्राम हुळ्ळे (वय ३५, रा. दोघे सिद्धरामेश्वर नगर, अाकाशवाणी केंद्राजवळ) यांचा मृत्यू झाला. चिदानंद बाबूराव चाबुस्कवार (वय ३५, रा. अाकाशवाणी केंद्राजवळ) हा गंभीर जखमी असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरू अाहेत.

उसाचे वाडे घेण्यासाठी तिघेजण दुचाकीवरून दुपारी वळसंगला गेले होते. परतताना समोरून येणाऱ्या वाहनाची जोरदार धडक बसली. अपघातानंतर वाहनचालक तसाच निघून गेला. नागरिक पोलिसांनी मिळून जखमींना सोलापुरात अाणले. कांबळे हुळ्ळे यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात अाले. प्रकाश हा टेम्पो चालक म्हणून काम करीत होता. त्याच्या मागे अाई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार अाहे. हुळ्ळे हा बिगारीचे काम करीत होता. पत्नी, एक मुलगा असा परिवार अाहे.
बातम्या आणखी आहेत...