आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीला बहुमत द्या, पिंपरी-चिंचवड करू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विकास कसा असतो याचे उत्तम उदाहरण पिंपरी चिंचवडमध्ये आहे. हा देशातील एक आदर्श विकास आहे. येत्या महापालिका निवडणुकीत सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसला एकदा बहुमत द्या. मग पाहा सोलापूरचा विकास कसा करतो, असे माजी उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे सोलापूर संपर्कप्रमुख अजित पवार यांनी सांगितले.
शहर-जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने बाबासाहेब गावडे मंगल कार्यालयात मंगळवारी सायंकाळी मध्य दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, “सोलापूरकरांनी शरद पवार यांना साथ दिली. तशीच साथ पुढेही द्या. सध्या ग्रामीण परिसरात निवडणुकीचे वारे आहेत. त्या ठिकाणी आपण धर्मनिरपेक्ष विचारांच्या मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढवत आहोत. काही ठिकाणी एकटे लढवत आहोत. सर्व कार्यकर्त्यांना संधी मिळेलच असे नाही. त्यासाठी निराश होता जोमाने, एकदिलाने काम करा.”

यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे, युन्नूस शेख, कय्युम बुऱ्हाण, भारत जाधव, प्रवीण डोंगरे, दिलीप कोल्हे, पीरअहमद शेख, मनोहर सपाटे, नाना काळे, गीता मामड्याल आदी उपस्थित होते.

टोलमध्ये मनसेने काय केले?
टोलबंद करू, टोलनाके बंद पाडू, अशी भाषा करणारा मनसे काही दिवसात शांत झाला. मक्तेदारासोबत काय झाले असेल? अशा शब्दांत श्री. पवार यांनी मनसेच्या नेत्यांवर टीका केली. ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या बाबतीत काय झाले, हे सर्वांनाच माहीत आहे. यामध्ये मुख्यमंत्री यांची भूमिका आश्चर्यकारक वाटली, असा टोलाही श्री. पवार यांनी लगावला.

एमआयएम जातीयवादी
कायदा तोडत अगदी टोकाचे बाेलून अल्पसंख्याकांची दिशाभूल करणारा एमआयएम पक्ष हे जातीयवादी पक्षाचे पिल्लूच आहे. इतके टोकाचे बोलूनही सरकार या पक्षाच्या नेत्यावर कारवाई का करत नाही? तसेच या पक्षामुळे अल्पसंख्याकांच्या मतांची विभागणी होते. ती भाजपच्या हिताची ठरते. यावरून तर ओळखा, असा सल्लाही श्री. पवार यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...