आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरच्या अॅग्नेलचा संगीतात अनोखा प्रयोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - संगीत क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या सोलापूरच्या अॅग्नेल रोमन सध्या ख्यातनाम संगीतकार साहित्यिक इरशाद कामील यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम सादर करीत आहे. कविता आणि साहित्य याचे मिश्रण असलेल्या या कार्यक्रमाला देशातच नव्हे परदेशातही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

इरशाद कामील हे देशातील नावाजलेले साहित्यिक आणि कवी. कामील यांच्या काही निवडक कवितांवर अभ्यास करून गिटारवर अॅग्नेलने चाल बसवली आहे. अॅग्नेलचे संगीत संयोजन आणि इंडियन आयडॉल फेम प्राजक्ता शुंकरे यांच्या पार्श्वगायनामुळे संगीताचा हा कार्यक्रम अप्रतिम झाला आहे. या कार्यक्रमाचे आतापर्यंत १६ प्रयोग झाले असून देशभरातून या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

एकता कपूरने दिली संधी : सुभाष घई यांच्या व्हिसलिंग वूड या स्टुडिओत काम करत असताना एकता कपूर यांनी रागिणी एमएमएस या चित्रपटाला संगीत देण्याची संधी दिली. अॅग्नेल यांनी अनेेक मानांकित संगीतकार म्हणून काम केले आहे. मूळचा सोलापूरचा असलेल्या अॅग्नेलचे शालेय शिक्षण सेंट जोसेफ स्कूलमध्ये झाले. गिटार, मेंडोलीन, ल्युट, युकेलेले, बझुकी ही पाश्चिमात्य वाद्ये तो वाजवितो. अॅग्नेलने २००३ मध्ये मंुबई गाठली. सेंट अॅन्ड्रयुस फ्युजन संगीत महाविद्यालयातून (कै.) पंडित जाधव आणि डॅनिअल पारख यांच्याकडून संगीताचे धडे घेतले. त्यांच्या संगीत क्षेत्रात करिअरसाठी आई (कै.) लिली कुटंुबीयांनी भक्कम साथ दिली. त्यांचा चंदेरी दुनियेचा प्रवास सुरू झाला. रागिणी एम.एम. एस., जिगरिया, डर -अॅट मॉल, मांझी या चित्रपटांना संगीत दिले आहे. येत्या २२ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या फिर उस मोड पर, २०१६ - दि एंड या हिंदी चित्रपटांनाही अॅग्नेलचे संगीत आहे.

जाहिरातीतही हातखंडा : अॅग्नेल रोमन याने चित्रपटासह अनेक जाहिरातींनाही संगीत दिलेले आहे. यात डव्ह सोप, कॅटबरी डेरी मिल्क, इंडिया प्रॉपर्टी डॉट कॉम, ब्रेक थ्रु बोर्नविटा, जाॅय फेस वॉश, विथ लव्ह फ्रॉम इंडिया वोडाफोन, नटराज पेन्सील समावेश आहे.

स्थानिक युवकांना संधी देणार
कामातून आनंद मिळावा या उद्देशाने आतापर्यंत काम केले. नामांकित गायक, कलावंत, संगीतकारांसमवेत काम करण्याची संधी मिळाली. आता सोलापुरातील कलावंतांना संधी देण्याची इच्छा आहे. अजून खूप काम करायचे आहे. अॅग्नेल रोमन, युवा संगीतकार
बातम्या आणखी आहेत...