आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरच्या कलावंतांचा 'सल', अभिनय, गायन, संगीत आणि कलादिग्दर्शनात सोलापुरी वर्चस्व

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्त्री जीवनाच्या संघर्षावर बेतलेला ‘सल’ या मराठी चित्रपटात सोलापूरच्या कलावंतांचे वर्चस्व आहे. लवकरच हा चित्रपट सोलापूरसह महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. गावातील पाटलाच्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील मुलीच्या संघर्षांवर आधारित चित्रपटाची कथा आहे. आई, वडील, दोन मुली असं छोटं कुटुंब . वडील थकलेले असल्यामुळे मोठ्या मुलीला शिक्षणाचा त्याग करून वीटभट्टीवर कामाला जावे लागते. नंतर पाटलाच्या मुलाशी पळून जाऊन प्रेमविवाह करते. कालांतराने नवरा व्यसनाधीन होतो आणि बायकोला विकतो. एका स्त्रीचा संघर्ष चित्रपटात दाखवण्यात आलेला आहे. पुण्याचे रवींद्र होनराव यांनी चित्रपटाची निर्मिती, लेखक,दिग्दर्शकाची जबाबदारीही सांभाळलेली आहे.

प्रमुख भूमिकेत सोलापूरची पूनम : याचित्रपटाची अभिनेत्री म्हणून पूनम चव्हाण हिने काम केले आहे. मुकेश गायकवाड, विनिता संचेती, उमेश मिटकीरी, प्रेम नरसाळे, कुणाल मोरे, लावणी हर्षू कांबळे यांच्याही भूमिका आहेत.

सुमधुर गीत संगीत
सोलापूरच्याप्रशांत देशपांडे यांच्या सुमधुर संगीताने चित्रपट नटला आहे. माहितीपट आणि चित्रपटांत सहाय्यक म्हणून काम केलेल्या प्रवीण राजगुरू या युवकाने कला दिग्दर्शनाचे काम केले आहे. पंढरपूरचे विनोद शेंडगे राही शेंडगे यांनी पार्श्वगायन केले आहे.

कथेनुसार आवश्यकअसणाऱ्या सर्वच गोष्टी उभारणे हे कला खेड्यातील प्रसंग उभारताना वेगळे अनुभव आले. शिवाय पोस्ट प्रॉडक्शन हा अनुभव अतिशय सुंदर होता. प्रवीण पुंडलिक राजगुरू, कलादिग्दर्शक

शूटिंगसाठी करावालागणारा प्रवास वेगळा अनुभव देऊन गेला. नाटकाचा मंच आणि चित्रपटाचा पडदा काय असतो हे उत्तमपणे जाणून घेण्याची प्रथमच संधी मिळाली. वीटभट्टीवर काम करणाऱ्या स्त्रीची जीवनकथा जवळून पाहता आली.ग्रामीण जीवनावरील वेगळी कथा आहे. पूनम चव्हाण, अभिनेत्री