आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१० युवतींसह तब्बल ८० जणांचे पथक, देवस्थान संस्थेकड़ून निमंत्रण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जगातील सर्वात श्रीमंत देव म्हणजे तिरुपती बालाजी. त्यांच्या तिरुपती येथील जत्रेत यंदा सोलापूरच्या युवतींना ढोल वाजवण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. यंदा १० युवतींसह तब्बल ८० जण या सोहळ्यासाठी जात आहेत.
प्रतिवर्षी येथील अथर्व गणपतीच्या परमवीर युवक मंडळाचे कार्यकर्ते तिरुपतीच्या ब्रह्मोत्सवात लेझीम पथकाद्वारे आपले वैविध्यपूर्ण सादरीकरण करतात. मागील सहा वर्षांपासून हा मान या मंडळाकडे आहे.

ब्रह्मोत्सव म्हणजे तिरुपती मधील मोठी जत्रा, विवाहसाेहळ्याप्रमाणेच याचा डामडौल असतो. अधिक महिन्यातील ब्रह्मोत्सव असताना वर्षातून दोनदा, पद्मावती ब्रह्मोत्सव आणि हैदराबादचा कल्याणोत्सव येथे २०११ पासून ४० जणांचे ढोल ताशा पथक ४० जणांचा लेझीमचा ताफा जात होता. यंदा या ताफ्यात १० युवतींचे विशेष ढोल ताशा पथक असणार आहे. त्यांना २५ युवकांचा गट ताशा, ध्वज घंटा पथक साथ देणार आहे. या सर्व समूहाचे नियंत्रण प्रवीण तंबाखे, सुभाष कलशेट्टी, ललिता पुडुर, सोनिया कलशेट्टी, श्रावणी पुरुड, श्रीनाथ मुंडे हे करीत आहेत.

सलग १० तास ३१ प्रकार
केवळ एकच प्रकारातील लेझीम ढोल सादर करता यंदा ३२ वेगवेगळ्या प्रकारात हे सादरीकरण होत असून सलग १० ते १२ तास हे सादरीकरण करणार होणार आहे. ४० जणांचा संघ एकावेळी नृत्य करतो, त्यातील कोणाला जर थकला तर लगेच त्याचा बदली साथीदार तेथे उभा रहात नृत्यातील सातत्य राखतो. ऑक्टोबर रोजी हे पथक रवाना होत असून तारखेपासून सात दिवस वेगवेगळ्या पोषाखात याचे सादरीकरण होणार आहे.

गरुड वाहन सेवेत एलईडी
^तिरुपतीतील बालाजीच्यागरुड वाहन सेवेवेळी एलईडी लाइटिंग करण्यात आलेले लेझीम सर्वांचे लक्ष वेधते. देशभरातून विविध कला सादर करणारी पथके येतात. परंतु सोलापूरचे लेझीम पाहण्यासाठी विशेष गर्दी असते. या पथकाद्वारे आपला तिरुपतीत एक वेगळा नावलौकिक झाला आहे. अभिमान वाटतो.” केदार खोबरे, अध्यक्ष परमवीर युवक मंडळ
]
बातम्या आणखी आहेत...