आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरमध्ये बँक आॅफ इंडियाच्या एटीएम रांगेतील १४ जणांना कारने उडवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर : नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर पैसे काढण्यासाठी एटीएमसमोर लागलेल्या रांगेतील १४ जणांना एका कारने चिरडल्याची घटना सोलापूरमध्ये शुक्रवारी घडली. जखमींपैकी दोन व्यक्तींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

कोटणीसनगरातील बँक आॅफ इंडियाच्या एटीएमसमाेर गुरुवारी दहा वाजेपासूनच १५०-२०० नागरिक रांगा लावून उभे होते. बँकेसमोरच सोलापूर महापालिका परिवहन समितीचे माजी सभापती सुभाष चव्हाण यांचे घर अाहे.

नेहमीप्रमाणे संतोष माळगे हा त्यांच्या कारचा चालक एमएच १३ एसी ४३६३ क्रमांकाची कार घेऊन घराबाहेर पडला. मुख्य रस्त्यावर जाताच त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती थेट एटीएमसमोर लोकांनी लावलेल्या रांगेत घुसली.

त्यानंतर पुढे उभी असलेल्या एमएच १३ एझेड ००२५ क्रमांकाच्या कारला धडक देऊन कार कशीबशी थांबली. दरम्यान, संतापलेल्या लोकांनी चालक माळगेला चांगलाच चोप दिला. विजापूर नाका पोलिसांनी याप्रकरणी कारचालक संतोषला अटक केली अाहे. दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...