आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार निवडणूक, अध्यक्षपदासाठी मारडकर, अागाशे, घोडके शर्यतीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक शुक्रवारी स्पष्ट झाली असून तिघेजण अध्यक्षपदासाठी इच्छुक अाहेत. विद्यमान अध्यक्ष शिवशंकर घोडके, लक्ष्मण मारडकर, देवेंद्र अागाशे यांच्यात चुरस अाहे. कोण बाजी मारणार हे अाॅगस्ट रोजी स्पष्ट होणार अाहे. तिरंगी लढतीमुळे यंदाच्या निवडणुकीत धाकधूक वाढली अाहे. मारडकर घोडके यांनी पॅनेल तयार केले अाहेत.
मारडकर:पार्किंग सेवा
वकिलांसाठी मेडिक्लेम पाॅलिसी, लाॅयर्स चेंबर विस्तारीकरण, वकिलांना बँकांमधून कर्ज देण्यासाठी प्रयत्न, कंझ्युमर सोसायटी नोंदणी करणेे, बार हॉलचे विस्तारीकरण, नव्याने सहा मजली इमारत होत अाहे, त्यासाठी पाठपुरावा, वकिलांसाठी पक्षकार यांच्यासाठी पार्किंग सुविधा तयार करण्याचा मानस. २१ वर्षांपासून सेवेत असल्याचे मारडकर म्हणाले.

अागाशे: स्टायफंड देणार
वकिलांची सेवा करण्यासाठी रिंगणात अाहे. पार्किंग समस्या सोडविणे, वकिलांना स्टायफंड मिळवून देणे, चेंबरचे विस्तारीकरण, कंझ्युमर सोसायटी, लिफ्ट, दोन इमारतींना जोडणारा पूल उभारण्यासाठी प्रयत्न. सोळा वर्षांपासून वकिली व्यवसायात असल्याचे अध्यक्षपदासाठी इच्छूक आगाशे यांनी सांगितले.

घोडके पाचव्यांदा मैदानात
शिवशंकर घोडके यांचे व्हीजन काय अाहे ही माहिती घेण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न झाला, पण संपर्क झाला नाही. घोडके हे पाचव्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यापूर्वी सलग दोन वेळा अध्यक्षपदाचा बहुमान त्यांनी मिळवला आहे. अध्यक्षपदाची ही त्यांची तिसरी टर्म आहे.

हे आहेत मैदानात
उपाध्यक्ष : एन.एस. बिराजदार, पी. बी. गायकवाड, एस. बी. गायकवाड, बाबासाहेब जाधव.
सचिव: संतोषहोसमनी, नागेश जंगाले, गणेश पवार, रियाज शेख.

सहसचिव: एन.डी. मुलवाड, हेमंतकुमार साका
खजिनदार: चंद्रसेनगायकवाड, अभिषेक गुंड, वाय. वाय. कणबसकर इच्छुक आहेत.
वकिलांचे प्रश्न

पक्षकार वकील यांच्यासाठी स्वतंत्र पार्किंग
बार हाॅलचे विस्तारीकरण झाले पाहिजे. वकिलांची संख्या वाढली अाहे. जागा अपुरी पडतेय
वकील पक्षकारांसाठी बार कॅन्टीनमध्ये बसण्यासाठी सोय पाहिजे. अनेकदा जागा अपुरी असते
लाॅयर्स चेंबरचे विस्तारीकरण सुविधा देणे
बातम्या आणखी आहेत...