आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधी विकास पॅनेलने उडवला दणदणीत 'बार', परिवर्तन पॅनेलचा उडवला धुव्वा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधी विकास पॅनेलच्या विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत जल्लोष केला. त्यावेळी टिपलेले छायाचित्र. - Divya Marathi
विधी विकास पॅनेलच्या विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत जल्लोष केला. त्यावेळी टिपलेले छायाचित्र.

विधी विकास पॅनेलच्या विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत जल्लोष केला. त्यावेळी टिपलेले छायाचित्र. छाया. दिव्य मराठी
सोलापूर- सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीत विधी विकास पॅनेलचा दणदणीत विजय झाला. या पॅनेलमधील उपाध्यपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला. परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडाला. बुधवारी दिवसभर मतदान झाले आणि सायंकाळी मतमोजणी झाली. या निवणुकीमध्ये परिवर्तन पॅनल आणि विधी विकास पॅनेल रिंगणात उतरले होते. ८४.३६ टक्के झालेल्या मतदानात ९०२ पैकी ७६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
"एकच ध्यास-सोलापूर बार असोसिएशनचा विकास' हा नारा देत विधी विकास पॅनेलने निवडणुकीत बाजी मारली. बुधवारी सकाळी वाजता मतदानास सुरुवात झाली. दुपारी बारा वाजेपर्यंत मतदारांचा उत्साह दिसून आला नाही. दुपारी एक वाजल्यानंतर मतदानात वाढ झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ८४.३६ टक्के मतदान झाले.
निवडणुकीत उतरलेले उमेदवार मतदान केंद्रासमोर उभारून मतदारांना "हाय हॅलो' करत होते. पोलिस बंदोबस्त आणि तीन मेटल डिटेक्टर आणण्यात आले होते. सायंकाळी सात वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली. शंभर मतांची एक फेरी घेण्यात येत होती. सहाव्या फेरीअंती विधी विकास पॅनेलचा एकतर्फी निकाल समोर आल्यानंतर आनंद साजरा करण्यात आला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा निवडणुकीचा निकाल लवकर लागला. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर होताच विजयी पॅनेलच्या सदस्यांनी एकच जल्लोष केला.
विजयी उमेदवारांना पेढे भरवून गुलालाची मुक्त उधळण करत सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. अप्पासाहेब शिंदे यांच्यासह बापूसाहेब देशमुख, भीमाशंकर कत्ते, विद्यावंत पांढरे, महेश जगताप, रेवण पाटील, पी. एम. रजपूत आदी पंधरा जणांनी काम पाहिले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, तिसऱ्यांदा अध्यक्षपद कुणाची लागली वर्णी, पॅनेल, उमेदवार आणि मिळालेली मते...