आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बारा आॅगस्ट रोजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बारा आॅगस्ट रोजी होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होऊन तेरा आॅगस्ट रोजी असोसिएशनचे नवीन पदाधिकारी पदग्रहण करतील.
शनिवारी सकाळी बार असोसिएशनच्या हॉलमध्ये कार्यकरिणीची बैठक झाली. त्यावेळी हा कार्यक्रम जाहीर झाला. रविवारी (दोन आॅगस्ट) वर्गणी भरून सभासद होण्याची शेवटची मुदत आहे. सोमवारी मतदार याद्यी जाहीर करण्यात येईल.

पाच सहा आॅगस्ट रोजी अर्ज विक्री स्वीकृती आहे. सात तारखेला अर्ज मागे घेणे अंतिम निवड निवड जाहीर करणे. आठ ते अकरा आॅगस्टला प्रचार होईल अशी माहिती बारचे सचिव भिमाशंकर कत्ते यांनी दिली. विद्यमान अध्यक्ष अप्पा शिंदे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. येत्या दोन दिवसात कोणते पॅनेल तयार होणार चित्र स्पष्ट होईल. सध्या वैयक्तीक गाठीभेटीवर इच्छुुक उमेदवारांनी भर दिला आहे.