आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात उभारण्यात येणार गारमेंट मेगाक्लस्टर, तेही केवळ महिन्यांत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूरच्या यंत्रमागावरील उत्पादनांनी जगाच्या बाजारपेठेत चुणूक दाखवली. परंतु या उद्योगाला सध्या चांगले दिवस नाहीत. त्याला गारमेंट उत्तम पर्याय ठरतो. त्यासाठी गारमेंट मेगाक्लस्टर उभारण्याचे प्रयत्न आहेत.
तीन महिन्यांत त्याला मूर्तस्वरूप देऊ, अशी ग्वाही राज्याचे उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी मंगळवारी दिली. कुंभारी येथील नवीन आैद्योगिक वसाहती निर्मितीची कार्यक्रमही लवकरच हाती घेण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
टेक्नोक्रॅट सेलच्या वतीने ‘मेक इन सोलापूर’ या विषयावर परिसंवाद झाला. त्या वेळी ते बोलत होते. सोलापूरची चादर आणि टॉवेल जगविख्यात झाली. परंतु बाजारपेठेतील तीव्र स्पर्धा, आधुनिकीकरण यामुळे काही समस्या निर्माण झाल्या. त्यावर उपाय कण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पर्यायांचा शोध घेण्याचे कामही सुरू केले. विदर्भ, मराठवाड्यांत वस्त्रोद्योगाला उभारी देण्यासाठी कृती आराखडाही देऊ केला. त्याच धर्तीवर पश्चिम महाराष्ट्रात म्हणजेच प्राधान्याने सोलापुरात वस्त्रोद्योग वाढीचे प्रयत्न राहतील, असे पोटे म्हणाले.

प्रा. नरेंद्र काटीकर यांनी कार्यक्रमाच्या अायोजनामागील उद्देश स्पष्ट केला. या वेळी सोलापूर एज्युकेशन साेसायटीचे सचिव अॅड. िवजय मराठे, एसव्हीआयटीचे प्रा. डॉ. मोहन देशपांडे, ऑर्किडचे प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार, प्राचार्य गजानन धरणे, डॉ. वासंती अय्यर, राजू राठी, पुरुषोत्तम उडता, डॉ. प्रमोद वैद्य, प्रभाकर वनकुद्रे, प्रीतम गांधी आदी उपस्थित होते.

संशोधन करूनउत्पादनांमध्ये नावीन्यता निर्माण करता येते. त्याला पेटंटही मिळवता येते. डॉ. शशिकांत हलकुडे

सोलापुरातमोठीबाजारपेठ आहे. परंतु उत्पादन करणाऱ्या संस्थाची कमतरता भासते. यावर विचार व्हावा. डॉ. वसंती अय्यर, प्राचार्या
सोलापुरात नवीनमोठे उद्योग येणे आवश्यक. कामगारांचे प्रश्नही सोडवणे गरजेचे आहे. पुरुषोत्तम उडता, उद्योजक

परिसंवादाचे उद्घाटन करताना उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, कुलगुरू डॉ. मालदार, महापालिका आयुक्त विजय काळम पाटील, चेंबर आॅफ काॅमर्सचे अध्यक्ष विश्वनाथ करवा, प्रा. नरेंद्र काटीकर अादी मान्यवर दिसत आहेत.