आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाइक रेसिंग'साठी सोलापुरातून रवाना होतेय दुचाकीवेडी तरुणाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महागड्या बाइक्सवरून ९० ते १२० किलोमीटर वेगाने हजारो किलोमीटरचा अखंड प्रवास. तासंतास फक्त रस्ता आणि रस्ताच. कमी वेळेत इच्छीत स्थळी पोहोचण्याचा ध्यास. याच वेडाने सोलापुरातील काही तरुणांनी मागील अनेक वर्षांपासून आपले दुचाकीप्रेम जागते ठेवले आहे. विविध राज्यांतील बाइक रेसिंग स्पर्धेत सहभाग नाेंदवत आहेत. यंदाच्या वर्षी ही तरुणाई नागपूर येथे होत असलेल्या स्पर्धेसाठी गुरुवारी सकाळी रवाना होत आहे.

सोलापुरात ९९ कॅनॉन्स मोटारसायकल क्लब ही महागड्या दुचाकीधारकांची रजिस्टर्ड संस्था आहे. यात कर्नाटक, अांध्र प्रदेश यांसह महाराष्ट्रातील विविध राज्यातील दुचाकीधारकांचा समावेश आहे. यातील सदस्यांकडे स्वत:च्या हायाबुसा, ह्योसंग, हार्ले डेव्हीडसन, रॉयल एनफिल्ड, थंडरबर्ड आदी महागड्या गाड्यांचा समावेश आहे. यंदा २२ जानेवारीला नागपूर येथे देशभरातील दुचाकीस्वारांसाठी बॉब एम. सी. क्लबने बाइक रेसिंग इव्हेंटचे आयोजन केले आहे. यात सोलापूरसह कर्नाटकातील जवळपास १८ जण सहभागी होत आहेत.

काय असते तेथे? : बाइकरेसिंग, थरारक स्टंट, उंचावर बाइक चढवण्याचे बाइक ट्रेकिंग, ब्रेकिंग, कच्चा रोड चिखलातून गाडी पळवण्याचे मड रेसिंग.

वाखाणण्या जोगे अंतर दुचाकीवर : यापूर्वीया क्लबतर्फे शिरसी ते चेन्नई, मागीलवर्षी शिरसी ते चंदीगड ते वाघा बाॅर्डर असा हजार किलोमीटर्सचा प्रवास तर यंदा दीड हजार किलोमीटरचा नागपूर प्रवास आहे. पुढच्या वर्षी सोलापूर ते नेपाळ असे जवळपास हजार किलोमीटरचा प्रवास ते करणार आहेत.

यांचा आहे सहभाग : जुजेपी. नरोना, राघवेंद्र शेट्टी, विकास मुळगुंड, मोहीबुद्दीन, प्रकाश रेवणकर, विनायक अणवेकर, सचिन अणवेकर, अश्फाक शेख, जुजे डिसुझा, भास्कर मडगावकर, प्रवीण मडगावकर, गिरीश नेतलकर आदी.

ठरवले ते करतोच
सलग सात ते आठ तास वाहन चालवण्याची क्षमता असलेल्यांनाच निवडतो. काहीतरी वेगळे केल्याचा आनंद वाटतो. हे एकप्रकारचे वेडच, जे ठरवतो ते करतोच. सचिन अणवेकर