आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरचे केबल नेटवर्क सील, लाखाहून अधिक घरात प्रसारण बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - करमणूक कर भरला नसल्याने शहरातील भीमा रिद्धी डिजिटल, सिटी डेन केबल नेटवर्कचे नियंत्रण कक्ष शुक्रवारी रात्री सील करण्यात आले. यामुळे शुक्रवारी सायंकाळपासून शहरात तीनही केबल कनेक्शनशी जोडलेले लाख ११ हजार ५७७ टीव्हीवरील प्रसारण बंद झाले आहे. शनिवारी पाच राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत. शनिवारी प्रसारण बंद राहिल्यास जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक लोकांची प्रचंड गैरसोय होणार आहे. केबल चालक आणि त्यांचे एजंट दर महिन्याला ग्राहकांडून भाडे वसुली करतात. मात्र ते शासनाकडे जमा करीत नाहीत. केबल चालकांना यापूर्वी अनेकदा मुदत देण्यात आली होती. नोव्हेंबरपासून त्यांना नोटीस देण्यात आली होती. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले. 
 
नोटिशीनंतर लगेच कारवाई 
^प्रशसनाने थकीत कर भरण्याबाबत मार्च रोजी नोटीस दिली, आम्ही मार्च रोजी मुदत देण्याची मागणी केली. मात्र आम्हाला कोणतीच संधी देता शुक्रवारी रात्री कंट्रोल रूम सील केले. यामुळे जे कर भरले आहेत, त्या ग्राहकांवर अन्याय आहे. म्हणणे मांडण्याची संधी देता थेट कारवाई झाली. रवींद्रपाटील, व्यवस्थापक भीमा रिद्धी नेटवर्क 
 
^तीनही केबलनेटवर्कला थकीत करमणूक कर भरण्याबाबत नोटीस दिली होती. मात्र त्यांनी कर भरण्याबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही. ३१ मार्चपर्यंत कर भरल्यास पुढील कारवाई करण्यात येणार आहे. अजितरेळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी. 

निमयित पैसे देणारांची अडचण 
केबलसेवा घेणारे बहुतांश ग्राहक दर महिन्याला भाडे देतात. मात्र ते करमणूक कर कार्यालयाकडे नियमितपणे जमा होत नसल्याचे या कारवाईतून स्पष्ट होते. मागील वर्षीही याच केबल चालकांवर अशीच कारवाई झाली होती. कारवाई झाल्यानंतर त्यांनी काही रक्कम जमा केली. यंदाही तोच कित्ता गिरवला आहे. शनिवार आणि रविवार हा सुटीचा दिवस असतो. पाच राज्याचे निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत. ते पाहता येणार नसल्याने नियमित पैसे भरणारांची गैरसोय होणार आहे. 

केबल चालक आणि त्यांची थकबाकी 
केबलकनेक्शन थकीत कर 
भीमा रिद्धी डिजिटल ९३, ११९ कोटी ३० लाख १९ हजार ८९४ 
डेन नेटवर्क ४,४८७ १५ लाख ७९ हजार २७९ रुपये 
सिटी नेटवर्क ३,५७१ लाख ७६ हजार २५ रुपये 
 
बातम्या आणखी आहेत...