आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपूजनाने दीपोत्सवास सुरुवात, रोषणाईने उजळले घर-अंगण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दिनदिन दिवाळी, गाई-म्हशी आेवाळी, गाई-म्हशी कोणाच्या, राम लक्ष्मणाच्या... अशी पारंपरिक गाणी म्हणूत सोमवारी दीपोत्सवाची सुरवात गाय- वासराच्या पूजनाद्वारे करण्यात आली. घरोघरी दिवाळी निमित्ताने करण्यात आलेल्या फराळाच्या पदार्थांचा नैवेद्य गोमातेला देण्यात आला. या निमित्ताने विविध सामाजिक संघटनांतर्फे गो-पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. 
 
आश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी. यादिवशी वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य (धन). त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. येथूनच दीपावली सणाला सुरुवात होते. 
 
उजळले घर-अंगण 
सोमवारी दिवाळीतील पहिला दिवा लावण्यात आला. तुळशीवृंदावनाजवळ लावलेल्या दिव्यांमुळे अंगण उजळले. प्रवेशद्वाराच्या कोनाड्यांमध्ये पणत्या ठेवण्यात आल्या. आकाशकंदील, विद्युत दिव्यांच्या माळांच्या झगमगाटाने परिसर उजळून निघाला. 
 
ब्रह्म प्रतिष्ठान 
दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्रह्म प्रतिष्ठानतर्फे वसुबारसनिमित्त गोवत्स पूजन आयोजिले होते. सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत इंदिरानगर येथील गणेश मंदिरात गोपूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आद्या गुरुजी, रेखा संगापूरकर, सचिवा अनुपमा रानडे, सुहास देशपांडे आदी उपस्थित होते. 
 
महापालिकेत प्रथमच पूजन 
महापालिकेत प्रथमच गायीचे पूजन महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. सोमवारी गोवत्स द्वादशीनिमित्ताने गाय-वासरांची पूजा झाली. यावेळी महापालिका महिला बालकल्याण सभापती अश्विनी चव्हाण, डाॅ. राजेंद्र गाजूल, नगरसेविका संगीता जाधव, मनीषा हुच्चे, ज्योती बमगोंडे, आरती सोनवणे, मेघना सामलेटी आदी उपस्थित हाेते. 
 
अल्लीमहाराज मठ 
स.स. अल्ली महाराज संस्थान गोशाळा, अक्कलकोट रोड येथील गोशाळेत ७० गायी आहेत. त्यांची नित्यनियमाने सेवा केली जाते. वसुबारसनिमित्त सोमवारी सायंकाळी सहा वाजता संस्थेचे ज्येष्ठ साधक तिप्पणा मुदगुंडी साधकांच्या उपस्थितीत गोपूजा करून पुरणाचे पदार्थ, गव्हाची खीर खाऊ घालून येथे उत्साहात वसुबारस साजरी करण्यात आली. संस्थेचे ‘भाऊराया २०१८’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. 
 
गोपूजन 
घरोघरीआज वसुबारसचा सण साजरा झाला. सामाजिक संस्था संघटनांतर्फे पूजेसाठी सार्वजनिक ठिकाणी गाय-वासराची व्यवस्था केली होती. ज्या ठिकाणी गायी, म्हशी आहेत तेथे हा सण मोठ्या प्रमाणावर उत्साहात साजरा झाला. पशुधन नसणाऱ्यांनी घरामध्ये मातीच्या, शेणाच्या गाई, म्हशींची छोटी प्रतिकृती करून त्यांचे पूजन केले. गाईचे दूध, गोमय, गोमूत्र हे दैनंदिन जीवनात उपयुक्त असतात. त्यामुळे भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून गाईला गो धन मानले जाते. गाईला देवता मानले जाते. त्यामुळे गाय तिच्या वासराविषयी अात्यंतिक प्रेम आणि जिव्हाळा आजही टिकून आहे. 
बातम्या आणखी आहेत...