आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिटीबसच्या क्रॅक चेसींची दुरुस्ती अशक्य; ‘आरटीओ’ची नोटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जेएनयूआरएम योजनेत घेण्यात आलेल्या १४५ सिटीबसपैकी अशोक लेलँड कंपनीचे ८७ जनबसचे चेसी क्रॅक झाले आहेत. ते चेसी पुन्हा दुरुस्त करणे हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे त्या बसची क्षमता बांधणी (फिटनेस) रद्द का करू नये? असे म्हणून आरटीओ विभागाने महापालिकेस गुरुवारी नोटीस दिली. त्यात महापालिकेस सात दिवसांची मुदत दिल्याचा उल्लेख आहे. आता या बस पुन्हा रस्त्यावर धावणे अशक्य आहे.
पुढे काय?
८७ जनबस रस्त्यावर धावणे अशक्य असून, पुढे महापालिका भूमिका काय घेते हे पाहणे आवश्यक आहे. महापालिका सभागृहाने याप्रकरणी कायदेशीर कारवाई करा, असा प्रस्ताव पारित केला आहे.

फिटनेस अशक्य
त्या बसची चेसी पाहणी केली असता ते क्रॅक अाहेत. त्यांची दुरुस्ती करून क्षमता बांधणी (फिटनेस) कायम राखणे अशक्य आहे. त्यामुळे त्या बसचे फिटनेस रद्द का करू नये, अशी नोटीस आरटीओ खरमाटे यांनी दिली. त्यासाठी त्यांनी सात दिवसांची मुदत महापालिकेस दिलीे.
तीन अधिकाऱ्यांच्या पथकाने दिला अहवाल
चेसी क्रॅक प्रकरणी तपासणी करण्यासाठी आरटीओ विभागाने जितेंद्र पाटोळे, प्रदीप इंगळे, उदय साळुंके या अधिकाऱ्यांची नेमणूक केली हाेती. त्यानुसार त्यांनी बसची तपासणी केली. त्यांनी १२ आॅगस्ट रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना अहवाल दिला. त्यानुसार खरमाटे यांनी गुरुवारी महापालिकेस नोटीस दिली.
बातम्या आणखी आहेत...