आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यासाठी सजले सोलापूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून आता प्रतीक्षा आहे ती भव्य सोहळ्याची. देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गौरव सोहळा रविवारी दुपारी ३.३० वाजता होत आहे. या सोहळ्यास केंद्र राज्यातील कॅबिनेट मंत्री उपस्थित राहत आहेत. राष्ट्रपती यांचा दौरा असल्याने महसूल पोलिस प्रशासनाने दौऱ्याची काटेकोर तयारी केली आहे.

दुपारी सोहळा असला तरी सकाळपासून महसूल पोलिस प्रशासनाने नियोजन केले आहे. विमानतळ, शासकीय विश्रामगृह, पार्क मैदान आदी ठिकाणी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शिवाय प्रत्येक व्हीआयपींना एक संपर्क अधिकारी नियुक्त केला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. व्हीआयपींची संख्या पाहता कोल्हापूर, सांगली सातारा येथून काही वाहने मागविण्यात आली आहे. शिवाय ६० खासगी वाहने अधिग्रहण करण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी रेळेकर यांनी सांगितले.

राष्ट्रपतींसाठीएक विमान आणि दाेन हेलिकॉप्टर
राष्ट्रपतीप्रणव मुखर्जी यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव एक विमान दाेन हेलिकॉप्टर असणार आहेत. याशिवाय श्री. सुशीलकुमार शिंदे यांच्या गौरव सोहळ्यासाठी इतर मंत्री व्हीआयपी येणार आहेत. होटगी रोडवरील विमानतळावरील विमान पार्किंगची मर्यादित क्षमता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने लातूर, उस्मानाबाद, बारामती येथील विमानतळावर पार्किंगची सोय केली आहे. याशिवाय एनटीपीसीचेही हेलिपॅड ताब्यात घेण्यात आले आहे. त्याठिकाणी दोन हेलिकॉप्टर उतरणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

मुख्य व्यासपीठावर राष्ट्रपतींसह १५ जण
माजीकेंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यासाठी पार्क मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. या अमृतमहोत्सवी सोहळ्यासाठी राष्ट्रपती कार्यालयाने दिलेल्या परवानगीनुसार राष्ट्रपतींसह १५ जण राहणार आहेत. यामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, सत्कारमूर्ती सुशीलकुमार शिंदे, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्यसभा विरोधी पक्षनेते गुलाम नबी अाझाद, माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर सुशीला आबुटे, माजी राज्यपाल डी.वाय. पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे.
बातम्या आणखी आहेत...