आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजनी धरणातील शहरासाठी २० टीएमसी पाणी आरक्षित ठेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पाऊसनसल्याने यंदा उजनीत पाण्याची पातळी कमी आहे. त्यामुळे आगामी काळातील पावसाचा विचार करता पुढील वर्षासाठी सोलापूर शहरासाठी उजनी धरणातील २० टीएमसी पाणी आरक्षित ठेवण्याची विनंती महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आतापर्यंतचे पावसाचे प्रमाण पाहता भविष्यकाळात उजनी धरणातील पाण्यावरच शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असणार आहे. त्यामुळे मे २०१६ पर्यंत धरणातील पाणी शहरासाठी आरक्षित करावे. महाराष्ट्र शासनाने उजनी धरणातील पाण्याचे आरक्षण केल्यास आतापासूनच धरणात पाणीसाठा राखीव ठेवता येऊ शकते. भविष्यातील जलसंकट ओळखून महापालिका आयुक्त काळम-पाटील यांनी पाण्याचे आरक्षण ठेवण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

बैठकांसाठीमनपा आयुक्त, उपायुक्त मुंबईला रवाना
स्मार्टसिटी, अमृत योजना, स्वच्छ भारत मिशन, डिजिटल इंडिया, हाउसिंग फाॅर आॅल या पाच योजनांसाठी राज्य शासनाने महत्त्वाची बैठक बोलवली आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त, उपायुक्त मुंबईला रवाना झाले.

६९० कोटींच्या नवीन जलवाहिनीचा आराखडा तत्काळ पाठवा - मुख्यमंत्री
पाणीपुरवठ्याच्याबाबत तीन प्रस्ताव महापालिका सभागृहात प्रलंबित आहेत. त्यापैकी ६९० कोटींचा उजनी ते सोलापूर नवीन जलवाहिनीचा आराखडा महत्त्वाचा आहे. सदरचा आराखडा ताबडतोब पाठवून देण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना मंगळवारी दिला. त्यानंतर आयुक्तांनी महापौर सुशिला आबुटे यांना पत्र दिले. उजनी ते सोलापूर नवीन जलवाहिनी, एनटीपीसीकडून आलेल्या २५० कोटी निधीबाबत निर्णय आणि जलसिंचन विभागास ९२ कोटींची हमी असे तीन पाण्याचे प्रस्ताव सभागृहात प्रलंबित आहेत. त्यावर तत्काळ निर्णय घ्यावा, असे पत्र महापालिका आयुक्त काळम पाटील यांनी महापौर सुशील आबुटे यांना मंगळवारी दिले.

कचराटाकल्यास दंड
शहरातीलफेरीवाले रस्त्यावर कचरा टाकतात. सूचना करूनही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे फेरीवाल्यांची २४ आॅगस्ट राेजी बैठक बोलवली आहे. कचराकुंडी असलेल्या ठिकाणीच कचरा टाकला पाहिजे. इतरत्र कचरा टाकल्यास २५ आॅगस्टपासून दंडात्मक कारवाई करणार आहे. आताचा दंड ५० रुपये असून तो ५०० रुपये करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मनपा करणार आहे. स्मार्ट सिटीसाठी या बाबींवर लक्ष केंद्रित केल्यास शहर स्मार्ट होईल. विजयकुमारकाळम-पाटील, आयुक्त, मनपा