आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटी व्हीजनमध्ये सोलापूर शहर देशात टॉपवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: स्मार्ट सिटी बैठकीत सहभागी पॉलिटेक्निक कॉलेजमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी.
सोलापूर - शहरातील नागरिक स्मार्ट सिटी मिशनला उत्फूर्त प्रतिसाद देत असून व्हीजन ठरवण्यात सोलापूर शहराचा देशात दुसरा क्रमांक आहे. बुधवारी व्हीजनचा शेवटचा दिवस असून शहर प्रथम क्रमांकावर असेल, असे स्मार्ट सिटी विभाग प्रमुख अमिता दगडे-पाटील यांनी सांगितले. यासाठी ‘माय गो’वर नागरिकांनी मत नोंदवावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांचे मत मागवण्यात येत असून, त्यासाठी शहरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांचा सक्रिय सहभाग आहे. महापालिकेच्या ५१ प्रभागांतील नागरिकांच्या संपर्कातून त्यांचे मत ‘माय गो’ बेवसाइटवर नोंदवण्यात येत आहे. बुधवारी मध्यरात्री १२ पर्यंत मत नोंदवता येणार आहे. याबाबत महापालिकेने नियोजन करून काम सुरू केले आहे. मंगळवारी सकाळी मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट, संगमेश्वर महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, वालचंद महाविद्यालय, दयानंद महाविद्यालयसह १२ महाविद्यालयांत मोहीम घेण्यात आली. प्रभागात नगरसेवकांच्या मदतीने नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग घेण्यात येत आहे. यासाठी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, सहाय्यक आयुक्त अमिता दगडे-पाटील, दत्तात्रय चौगुले, प्रा. नरेंद्र काटीकर, लक्ष्मण बाके, अनुज पांढरपट्टे यांच्यासह सुमारे ५०० विद्यार्थी सक्रिय आहेत.

हजार जणांची मते
स्मार्टसिटी मोहिमेत ‘माय गो’वर मत नोंदवण्यात सोलापूर देशात टॉपवर आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत सुमारे हजार जणांनी मत नोंदवले होते. बुधवारी त्यात वाढ होण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आहे. स्मार्ट सिटीत पहिल्या स्थानावर हुबळी (कर्नाटक) आहे तर सोलापूर दुसऱ्या स्थानावर आहे.