आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur City Water Problem Solution For NTPC CM Fadnvis

एनटीपीसी भागवणार शहराची तहान मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर; शहरातकर आकारणी नसलेल्या दोन लाख मिळकती आहेत. त्यांच्याकडून तत्काळ कर आकारणी करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कर भरणाऱ्या मिळकतीचा शोध घेतल्याबद्दल मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांचे अभिनंदनही मुख्यमंत्र्यांनी केले.
मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिकेच्या प्रश्नासंदर्भात बैठक घेतली. कर भरणाऱ्या मिळकतींची आकारणी निश्चित झाल्यावर कमी-जास्त असेल तर पुढील बिलात ती दुरुस्ती करावी. यामुळे मनपाचे उत्पन्न वाढेल. असा पॅटर्न राज्यातील इतर महापालिकेत लागू करता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
उजनीधरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी एनटीपीसीची जलवाहिनी टाकण्याचे काम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. बैठकीतूनच एनटीपीसी संचालकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली असून त्यांनी तत्वत: मंजुरी दिली आहे. जलवाहिनीसंबंधी एनटीपीसी राज्य शासनामध्ये लवकरच सामंजस्य करार केला जाईल. ज्यावेळी जलवहिनीतून शहराला पाणी दिले जाईल, त्यावेळी कंपनीशी अंतिम करार केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा आढावा बैठकीत ते बोलत होते. शहराला एनटीपीसीच्या बंद पाइपलाइनमधून पाणीपुरवठा व्हावा, शहरातील प्रक्रिया केलेले पाणी एनटीपीसीने वापरावे याबाबत निर्णय घेण्यात आला होता. यासाठी एनटीपीसीने तत्वत: मान्यता दिली आहे. एनटीपीसीमार्फत ११५ किमी लांबीची ७५ एमएलडी क्षमतेची नवीन जलवाहिनी उजनी धरणापासून टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ८० कि.मी.चे काम झाले असून १७ कि.मी. लांबीचे काम सुरू आहे. उर्वरित १८ कि.मी.पाइपलाइनचे काम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी यांची बदली नाही :
जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या गेल्या वर्षभरात बदलीच्या अफवांचे पीक होते. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पडदा टाकला. जिल्हाधिकारी मुंढे यांनी बदली मागितली तरी बदली करणार नाही, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, असे सांगत बदली होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.

इमेज मिळाले पण संख्या अंदाजे
जीआयएससर्व्हेअंतर्गत शहरातील मिळकती मनपा शोधत आहे. या कामाचा मक्ता सायबर टेक कंपनीला दिला आहे. सॅटेलाईटच्या माध्यमातून कंपनीने शहरातील मिळकतींचे इमेज(छायाचित्र) मिळवले आहे. यात २.२५ लाख इमेज मिळाले आहेत. त्यांचा प्रत्यक्ष सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यानंतर नक्की आकडा कळणार आहे. दोन लाख टॅक्स नसलेल्या मिळकती मिळतील, असा अंदाज मनपाचा आहे.

टक्के व्याजदराने देणार कर्ज...
राज्यातीलनगरपालिका महापालिकांसाठी जिथे १०० टक्के घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया आहे, अशा शहरांना टक्के व्याजदराने ३० वर्षांकरिता दीर्घमुदतीचे कर्ज देण्यासाठी शासन निधी तयार करीत आहे. यातून नगरपालिका, महापालिका हद्दीत विकास कामे होणार आहेत. याचा अधिकाधिक लाभ नगरपालिका महानगरपालिकांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. राज्यातील १९ नगरपालिका शहरात उघड्यावर शौचालय बंदी झालेली आहे. यामध्ये जिल्ह्यातील नगरपालिकांचा समावेश आहे. याबद्दल जिल्हाधिकारी मुंढे यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

सल्लागार समिती नियुक्तीचा आदेश
नवीन जलवाहिनीतून उपलब्ध होणारे ७५ एमएलडी पाणी शहराला पिण्यासाठी देण्यात येईल. नागरिकांनी वापरलेले पाणी विविध ठिकाणी एनटीपीसीला आवश्यक त्या गुणवत्तेने उपलब्ध करून दिले जाईल. यासाठी लागणारा खर्च पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) द्वारे उभा करण्यात येईल. मनपा एनटीपीसीमध्ये सामंजस्य करार (MOU) करण्यासाठी सल्लागार नियुक्ती करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले.