आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा व्यवस्थापनातील ढिसाळपणावर सापडेना उपाय, आर्थिक बोजा स्वीकारूनही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेचा २०१६-१७ च्या अंदाजपत्रकावर नजर टाकल्यानंतर शहर स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसते अाहे. अंदाजपत्रकासाठी तयार करण्यात अालेल्या विविध कामांमध्ये, वैशिष्ट्यपूर्ण तरतुदींमध्ये किंवा सूचना शिफारसीमध्ये कुठेही शहर स्वच्छता, कचरा उचलणे याबाबत काही तरतुदी दिसत नाहीत. कोणाच्या सूचनाही नाहीत हे विशेष. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसते. केवळ स्मार्ट सिटीचा गाजावाजा करण्यातच मनपा प्रशासन अाणि पदाधिकारी गुंतल्याचे दिसते.
सोलापूर शहराची लोकसंख्या एकूण दहा लाखांच्या जवळपास अाहे. त्या तुलनेत महापालिकेची यंत्रणा निम्मीच अाहे. झाडूवाले, कचरा उचलणारे बिगारी, घंटागाड्या, डंपर अादींचा विचार केला तर महापालिका याबाबत गंभीर नसल्याचेच दिसते. अंदाजपत्रकात यावर चर्चा होऊन काही ठोस तरतूद झाल्याचे दिसले नाही. त्यातच महापालिकेची यंत्रणा जी अाहे ती असताना खासगीकरणाचा बोजा मनपाने डोक्यावर घेतला अाहे. पण त्याचीही अंमलबजावणी दिसत नाही. त्यामुळे धड मनपाही कचरा व्यवस्थापन करीत नाही अन् खासगीकरणानेही होत नाही, असे चित्र सध्यातरी अाहे.

स्मार्टसिटीत स्वच्छतेचा मुद्दा : सोलापूरशहर स्मार्ट सिटी म्हणून जाहीर झाले अाहे, त्यात पहिल्या स्थानावर शहर स्वच्छतेचा मुद्दा अाहे. त्यासाठी तरतूद केल्याचेही स्मार्ट सिटी अाराखड्याच्या कागदावर अाहे. पण प्रत्यक्षात शहरातले चित्र पाहिले की, खरेच का स्मार्ट कारभार असे म्हणण्याची वेळ अाहे. स्मार्ट सिटीचे कामकाजही अजून नीटसे सुरू नाही. अजून टेंडर प्रक्रिया व्हायच्या अाहेत. त्यामुळे एकूणच स्वच्छतेच्या बाबतीत बोजवारा उडाल्याचेच दिसते अाहे.

खासगीकरणाचाघोळ : मनपानेसफाईचा अाणि कचरा उचलण्याचा मक्ता पूर्वी समिक्षा कंपनीला दिला होता. समिक्षानेही घोळ घातला. हा मक्ता मनपाच्या अंगलट अाला. त्यानंतर काही दिवस मनपानेच कचरा उचलण्याचे काम सुरू झाले. पण त्याचाही बोजवारा उडाला. अाता पुन्हा मक्ता मागविण्यात अाला अाहे. त्यासाठी ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट सेल प्रायव्हेट लिमिटेड, बीव्हीजी इंडिया लिमिटेड, यशश्री एंटरप्रायजेस यांनी अापापला मक्ता सादर केला अाहे. महापालिकेने अजून त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यातही अाता बीव्हीजी कंपनीचा मक्ता रद्द करण्याचा प्रयत्न अाहे. महापालिका नेहमी हाच घोळ करीत अाली अाहे.

घरोघरी जाऊन कचरा गोळा करणार
^घरोघरीजाऊन घंटागाड्यांद्वारे कचरा गोळा करण्यासाठी खासगीकरणातून मक्ता मागविण्यात अाला अाहे. त्यामुळे लवकरच घरोघरी जाऊन घंटागाडी कचरा गोळा करणार अाहे. हा कचरा घंटागाडीतून थेट मोठ्या डंपरमध्ये गोळा केला जाईल अाणि डंपर थेट कचरा डेपोत नेऊन टाकेल. त्यासाठी टेंडर मागविले अाहेत. संजयजोगदनकर (सफाई अधीक्षक)

Áजवळपास हजार ५०० झाडूवाले पाहिजेत, प्रत्यक्षात मात्र ६८५ अाहेत.
Á१५० घंटागाड्यांची गरज, प्रत्यक्षात अाहेत ७०
Áशहरात केवळ १२३० कचरा कुंड्या अाहेत, त्याची संख्या वाढविण्याची गरज अाहे.
Áरोड काॅम्पेक्टर अाहेत, अाणखी ची गरज
Áडंपर अाहेत, अाणखी डंपर असणे आवश्यक , जुने ट्रक वापरले जातात.
Áसफाई अास्थापनेवरील वेतन खर्चासाठी ४४.८० टक्के खर्च होत अाहे.
Áसध्या या सर्व यंत्रणेतून ३०० टन कचरा उचलला जात असल्याचा दावा अाहे. पण प्रत्यक्षात शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसताहेत.
Áविविध ठिकाणी घंटागाड्या बंद अवस्थेत दिसून येतात.

घंटागाड्या नावालाच
शहरात एकूण ७० घंटागाड्या अाहेत. त्यातही काही दुरुस्तीसाठी साधू वासवानी उद्यान येथे पडून अाहेत. शिवाय अन्य घंटागाड्याही तेथेच थांबून राहिलेल्या दिसतात. दिवसभरात त्यांच्या किती फेऱ्या होतात याचे अाॅडिट मनपाकडे नाही. शहरात घंटागाड्या फिरताना दिसत नाहीत. खासगीकरणाच्या वादात या महापलिकेच्या घंटागाड्या नाहीत, अन् ठेकेदारांच्याही नाहीत.
पोलिस आयुक्तालयाजवळील पाणी टाकी परिसरात अनेक घंटागाडी बंद अवस्थेत दिसून येतात.

आठ दिवसांत काम दिसेल
^कचरा निर्मूलनासाठी आमचे सूक्ष्म नियोजन सुरू आहे. त्यामुळे तीन ते चार दिवसांत ते तयार होईल. त्यानंतर तुम्हाला काम दिसेल. मक्ता निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आमचे शक्य तितके कचरा उचलण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आठ दिवस थांबा. अभिजितहराळे, मनपा सहाय्यक आयुक्त
खर्च होतो दुप्पट, स्वच्छता मात्र नाहीच
एकीकडे शहरात महापालिका स्मार्ट सिटीचा गाजावाजा करीत अाहे, तर दुसरीकडे सोलापूर महापालिकेचे कचऱ्याचे व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले अाहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग रस्त्याच्या कडेला दिसताहेत. त्यामुळे दुर्गंधी अन् घाणीचे साम्राज्य दिसते अाहे. गावठाण भागात वेळेवर कचरा उचलला जात नाही, त्यातच जनावरांचा वावर असल्याने कचरा रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरला जातो. अोला कचरा, सुका कचरा वेगळा टाकण्यासाठी कोणतीच सुविधा मनपाने केलेली नाही. सफाई विभागाकडे कर्मचारी असताना दुसरीकडे मनपा खासगीकरण करून अार्थिक बोजा अंगावर अोढवून घेत अाहे. पैसे दुप्पट खर्च होतात पण स्वच्छता मात्र दिसत नाही.
सध्याची कचरा व्यवस्थापन यंत्रणा
À महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा
À कचरा उचलण्यात होत असते नेहमीच दिरंगाई
À दुर्गंधी अन्‌ घाणीचे साम्राज्य असे चित्र नेहमीचे
À कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची नाही यंत्रणा
À कचरा उचलणाऱ्या गाड्यांची नकारघंटाच
बातम्या आणखी आहेत...