आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांवर आली खुर्ची जप्तीची नामुष्की अन् पळवाट शोधून टाळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हाधिकाऱ्यांची  खुर्ची जप्त होण्याची नामुष्की आदेशातील संदिग्धतेवर बोट ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी टाळली. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार जप्तीसाठी पथक आले होते. त्याच्याकडे जप्त करायच्या वस्तूंच्या यादीचा आदेश दाखवण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. आदेशात जंगम वस्तू असा उल्लेख असल्याने पथक परतले. भूसंपादनाचा मोबदला दिला नसल्याने न्यायालयाने आदेश दिले होते. 
 
कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील धरणासाठी भूसंपादन केल्यानंतर श्रीपती जाधव काशिनाथ जाधव यांना मोबदला कमी मिळाला. दोन्ही शेतकऱ्यांनी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला. यावर न्यायालयाने काशिनाथ जाधव यांची लाख ५१ हजार तर श्रीपती जाधव यांनी लाख ४६ हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. रक्कम दिल्यास जिल्हाधिकारी यांची जंगम मालमत्ता जप्त करण्याचा आदेश न्या. बी. के. अनुभुले यांनी दिले होता. जंगम मालमत्तेचा आदेशात स्पष्ट उल्लेख नव्हता.
 
सोमवारी दुपारी १२ वाजता बेलिफ ए. एस. ससाणे, एस. एच. जाधव, बी. एम. गायकवाड, अॅड. एस. जी. सगुमुळे, अॅड. वैभव माने, शेतकरी श्रीपती जाधव, काशिनाथ जाधव जप्तीसाठी आले. दुपारी वाजता जिल्हाधिकारी यांनी त्यांना चर्चोसाठी बोलावले. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘मीही शासनाचेच काम करीत आहे. न्यायालयाने कोणत्या वस्तू जप्त करण्याचे आदेश दिले आहेत, त्या वस्तूची यादी दाखवा किंवा मी सांगेल त्या वस्तू घेऊन जा’, असे सांगत शासनाकडून निधी नसल्याने ही रक्कम देता आली नसल्याचे स्पष्ट केले. 
 
आदेशामध्ये स्पष्ट उल्लेख नव्हता 
भूसंपादनाची रक्कम दिल्याने जप्तीची कारवाई होत असते. जप्ती पथकाकडे कोणत्या वस्तू जप्त करायच्या याची यादी नव्हती. आदेशामध्ये स्पष्ट उल्लेख नव्हता. शेतकऱ्यांना रक्कम मिळण्यासाठी सिंचन विभागास पत्र दिले आहे.” - अजित रेळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी 
 
 
बातम्या आणखी आहेत...