आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णिक नगरातील १२१ जणांची घरे ताब्यात घेण्याचे दिले आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रमाकांत कर्णिक नगर सहकारी गृहनिर्माण संस्था बी ग्रुपमधील २६३ सभासदांपैकी १२१ सभासदांना शासनाची मंजुरी नाही. शिवाय लोकायुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार वरील १२१ प्रकरणांत शर्तभंग झाल्याने ही जागा इमारत बांधकामासह ताब्यात घेऊन शासनाकडे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी प्रांताधिकारी शहाजी पवार अधीक्षक भूमी अभिलेख यांना दिले आहेत. याचा अहवाल १५ दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही आदेशात नमूद केले आहे.
कब्जा घेण्याचे आदेश
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात ही जागा शहराच्या मध्यवस्तीत असून या जागेचा ताबा शासनाकडे घेतल्यानंतर त्या जागेत असलेल्या इमारतीची जागेची निगराणी करणे, त्याठिकाणी अतिक्रमण होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी. ही जागा शासन जमा केल्यानंतर त्याबाबतचा पंचनामा, कब्जेपावती दुरुस्त मिळकतपत्रिका जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी, असेही नमूद केले आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून जाणून घ्‍या, संबंधित अधिक माहिती..