आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur Commissioners New Initiative For Theft Jewelry

हस्तगत दागिने लोकांना परत देणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - घरफोडी,चोरी झाल्यानंतर नागरिकांचे दागिने, पैसे, घरातील महागड्या वस्तू मिळतील की नाही याचा नेम नसतो. केव्हातरी एखादा चोरटा जाळ्यात पडल्यानंतर त्यांच्याकडून जप्त केलेले दागिने पोलिस ताब्यात घेतात. न्यायालयात अर्ज केल्यानंतर त्यांच्यामार्फत दागिने संबंधित व्यक्तीला देण्यात येतात. पण, एक आगळा उपक्रम पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर सुरू करणार आहेत.

चोरांकडून जप्त केलेले दागिने संबंधित व्यक्तीला पोलिस आयुक्तालयात बोलावून घेऊन सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे. या महिन्यात अथवा आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा कार्यक्रम आहे. मागील दीड महिन्यात सातही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचा तपास करून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केल्यानंतर सुमारे तीस तोळे दागिने, घरगुती साहित्य, वाहने जप्त केली आहेत. त्यांच्या मूळ मालकांना माहिती देण्यात आली आहे. जप्त केलेले साहित्य मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर ते दागिने फिर्यादीला देण्याचे आदेश असतात. दागिने साहित्य देण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शंकर जिरगे यांनी दिली.

१५ गुन्ह्यांतील ऐवज हस्तगत
१५गुन्हामधील दागिने, आदी साहित्य हस्तगत केलेे. न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर तो ऐवज संबंधितांना परत देण्यात येईल. आतापर्यंत तीस तोळ्यांच्या आसपास दागिने जप्त आहेत. लवकरच हा कार्यक्रम हाती घेणार आहेत.” रवींद्रसेनगावकर, पोलिस आयुक्त

डॉ. उपाध्याय यांनीही राबवली होती योजना
नागरिकांनासन्मानपूर्वक दागिने परत देण्याची योजना तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी राबवली होती. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. नागरिकांमध्येही पोलिसांप्रती विश्वासाची भावना वाढीस लागली होती.