आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पतीला पोटगी देण्याचा कमावत्या पत्नीला अादेश, सोलापूर कोर्टाचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - घरात पडेल ते काम करणाऱ्या पतीस किरकोळ चुकीबद्दल मुख्याध्यापिका पत्नीने घरातून हाकलून दिले. त्यावर पतीने न्याय हक्कासाठी न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी सोलापूर दिवाणी न्यायाधिश (वरिष्ठ स्तर) व्ही. पी. पाटील यांनी पीडित पतीस दरमहा दोन हजार रुपयांची अंतरिम पोटगी द्यावी, असा आदेश त्याच्या पत्नीस दिला. पत्नीकडून पतीस पोटगी मिळण्याचा हा पहिलाच निकाल असल्यामुळे सर्वत्र या निकालाची चर्चा हाेत अाहे.
अजय व संगीता (दोघांचे नाव बदलेले) यांचा विवाह २४ नोव्हेंबर २००४ रोजी सांगली जिल्हा जत तालुक्यातील गुड्डापूरच्या दानम्मादेवी देवस्थान येथे झाला. संगीता ही उच्च शिक्षित तर अजय अल्पशिक्षित आहे. अजय हा सांगली जिल्ह्यातील तर संगीता ही सोलापूर जिल्ह्यात राहणारी. अजयच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. तरीही संगीताने त्याच्याशी लग्न केले. लग्न करताना तिने घरजावाई हाेण्याची अट घातली. तसेच घरातील सर्व कामे तुच करायला लागतील, असेही मान्य करुन घेतले. त्यानुसार अजय सर्व कामे करायचा. एक दिवशी घरात अजयच्या हातून दुध सांडले. एवढ्या कारणावरून संगीताने शिवीगाळ करून त्याला मारहाण केली आणि घरातून हाकलून दिले. अजयने संगीताची माफी मागितली, दयायाचना केली. पण तिने काही एेकले नाही. घरातून बाहेर पडल्यावर अजयचे हाल झाले. अखेर कंटाळून त्याने दिवाणी न्यायालयात हिंदू विवाह कलम ९ व १४ अन्वये संगीता हिने आपणास नांदवण्यासाठी घरात घ्यावे व प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत पोटगी मिळावी, अशी मागणी केली. सर्व परिस्थिती पाहून न्यायालयाने अर्ज दाखल केल्यापासून अजयला दरमहा दोन हजार रुपये पोटगी द्यावे असे संगीताला आदेश दिले. याप्रकरणी अर्जदार पतीकडून अॅड. जयदीप
माने आणि अॅड. मनोज गिरी यांनी काम पाहिले.
घरची कामे लादली
लग्नाच्या वेळी झालेल्या अलिखित करारानुसार संगीताने अजयवर घरातील सर्वच कामे लादली हाेती. इतकेच नव्हे तर ती अजयकडून हात- पाय देखील चेपून घेत हाेती. अाणि किरकाेळ चुकीबद्दल त्याला घराबाहेर काढण्यात अाले हाेते.
बातम्या आणखी आहेत...