आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसाचा चावा घेतला, एकास 6 महिने सक्तमजुरी, 20 वर्षानंतर निकाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी - रात्री गस्तीच्या वेळी पोलिसास चावा घेतल्याप्रकरणी एकास न्यायाधीश भागवत झिरपे यांनी सहा महिने सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली. ज्ञानदेव निवृत्ती खराडे (रा. हिरेमठ हॉस्पिटलजवळ, बार्शी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तब्बल २० वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला.
एक मार्च १९९६ रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास पोलिस हेडकॉन्स्टेबल मोहन आप्पासाहेब पाटील हे रात्रगस्त घालत होते. त्यावेळी ज्ञानदेव खराडे हा बाहेर बसला होता. त्यामुळे हेडकॉन्स्टेबल पाटील यांनी त्याला हटकले. त्यामुळे चिडून ज्ञानदेवने हेडकॉन्स्टेबल पाटील यांना चावा घेतला. त्यामुळे त्यांना इजा झाली. याप्रकरणी पाटील यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार ज्ञानेश्वरविरोधात दाखल केली होती. त्यावरुन गुन्हाही दाखल झाला. या खटल्यात सरकारपक्षातर्फे अॅड. प्रसाद कुलकर्णी यांनी एकूण चार साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यामध्ये फिर्यादी व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष ग्राह्य धरून न्यायाधीश बी.टी.झिरपे यांनी आरोपी ज्ञानदेव खराडे यास सहा महिने सक्तमजुरी व दोन हजार दंड आणि दंड न भरल्यास २० दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.