आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेवर अत्याचार, लोहमार्ग पोलिसांकडून तिघांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - काम देण्याच्या आमिषाने एका महिलेवर दुष्कर्म विनयभंग केल्याप्रकरणी तिघा जणांना सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली अाहे. ही घटना शुक्रवारी पहाटे एकच्या सुमाराला उघडकीस अाली. पहाटे पाचला गुन्हा दाखल झाल्यानंतर सकाळी कारवाई झाली.
पैगंबर ऊर्फ सय्यद दगडू शेख (वय ४०, रा. चिंचोळी, एमअायडीसी, सोलापूर), अप्पासाहेब दत्तू तोडकर (वय ४८, रा. नान्नज, सोलापूर), चंद्रकांत महादेव स्वामी (वय ३१, रा. सुलतानपूर, अक्कलकोट) या तिघांना अटक झाली अाहे. ही घटना ११ ते २० अाॅक्टोबर या दरम्यान, सोलापूर रेल्वे स्टेशन परिसर, गाणगापूर, कोल्हापूर, पाकणी या भागात घडली अाहे.

पीडित महिला नगर जिल्ह्यातील अाहे. ती घरगुती कारणावरून झालेल्या भांडणानंतर नगरहून दौंड रेल्वे स्थानकावर येऊन बसली होती. तिला पुण्याला जायचे होते. ती सोलापुरात अाली. त्यावेळी स्वामी हा पुण्याला जात होता. त्याने तिच्याशी अोळख करून घेतली. नोकरी देण्याच्या अामिषाने गाणगापूरला घेऊन गेला. यानंतर त्या महिलेला घेऊन कोल्हापूर भागात नेला. सोलापुरात अाल्यानंतर शेख याच्याशी अोळख करून दिली. त्याने स्वामी याच्याशी अोळख करून दिली. तिघांनी असाह्यतेचा फायदा घेऊन महिलेचा विनयभंग करून दोघांनी दुष्कर्म केल्याचे फिर्यादीत म्हटले अाहे. ही घटना उघडकीस अाल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या नातेवाइकांना माहिती दिली अाहे. पीडित महिला सुरुवातीला सोलापूर स्टेशन पोलिस चौकीत गेली.

लोहमार्ग पोलिसांकडे पाठविल्यानंतर त्यांनी तक्रार नोंदवून घेतली. दोघांवर दुष्कर्म तर एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला अाहे. अारोपींना अटक झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनोद सातव यांनी दिली. तिघेही संशयित अारोपी एकमेकाचे मित्र असून विविध ठिकाणी खासगीत काम करतात. फिर्याद देताना एक संशयित अारोपी स्टेशन भागातच फिरत होता. त्यावेळी महिलेच्या मदतीने पकडून ठेवले होते. इतरांना नंतर शोधण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...