आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेळीबारातील जखमी प्रियकराचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - प्रेयसीच्या वडिलांनी तोंडावर आणि पायावर गोळी झाडल्यामुळे जखमी झालेल्या विनायक शिवानंद हुबळीमठ (वय १७, रा. घोंगडे वस्ती, सोलापूर) या मुलाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. मागील २४ तासांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता. शस्त्रक्रिया करून त्याच्या शरीरातील गोळ्या काढण्यात आल्या. तसेच त्याला तब्बल ४५ बाटल्या रक्त देण्यात आले होते. मात्र त्याच्यावरील उपचाराला यश अाले नाही.

बसवराज चौगुले (४५) या निवृत्त सैनिकाच्या मुलीवर विनायकचे प्रेम हाेते. घरच्यांच्या विराेधामुळे २७ जुलै राेजी हे युगुल पुण्याला पळून गेले हाेते. पाेलिसांनी या दाेघांना समजावून परत घरी अाणले व कुटुंबीयांच्या ताब्यात दिले हाेते. याच रागातून चाैगुले याने शनिवारी रात्री विनायकच्या घरी जाऊन त्याच्यावर गाेळ्या झाडल्या हाेत्या. दरम्यान, पाेलिसांनी चाैगुलेला अटक केली असून न्यायालयाने त्याला २० अाॅगस्टपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली अाहे.
तर कदाचित विनायक वाचला असता...
शनिवारी विनायक बंगळुरूला जाणार होता. त्याने रात्री साडेदहाच्या गाडीचे तिकीटही काढले हाेते. गावाला जाण्याची तयारी करत असतानाच रात्री साडेआठच्या सुमारास त्याच्यावर हा प्रसंग बेतला, असे सांगत विनायकच्या वडिलांनी त्याचे रेल्वे तिकीट दाखवले.