आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खरेदीचे सीमोल्लंघन घर, सोन्यात गंुतवणूक, वाहनांच्या विक्रीत २० ते ३० टक्यांनी वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने बाजारपेठांमध्ये गेला. रिअल इस्टेट, साेन्यांत मोठी गुंतवणूक केली. वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची दालनेही ग्राहकांनी फुलून गेली होती. खरेदीचे जणू सीमोल्लंघनच झाले. व्यापारी सुखावले. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक, जो खरेदीसाठी शुभ मानला जातो. या दिवशी सोने घेण्याची मोठी परंपरा आहे. त्यामुळे बाजारपेठेतील सुवर्णपेढ्या लकाकल्या होत्या. सायंकाळी ग्राहकांनी या पेढ्या फुलून गेल्या.

सरस्वती चौक, लकी चौक, नवी पेठ, अशोक चौक, पूर्व भागातील काही दुकानांमध्ये एलईडी टीव्ही, फ्रीज, एसी, मोबाइल, ड्युअल डुअर इन डुअर रेफ्रीजरेटर आणि जेट स्प्रे तंत्रज्ञानासह वॉशिंग मशीन बाजारात होते.

गेल्या काही दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळाला. त्यांचा पैसा वाहन क्षेत्रात मोठ्या संख्येने आला. यंदा वाहनांच्या विक्रीत २० ते ३० टक्यांनी वाढ झाली. ६०० दुचाकी आणि ४०० चारचाकींची विक्री झाली. सुमारे ४० ते ४५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

सातवा वेतन आला
^पाऊससातव्या वेतन आयोगाचा चांगला परिणाम चारचाकी विक्रीवर झाला. यंदा २० ते ३० टक्के अधिक प्रमाणात चारचाकीची विक्री झाली. अंदाजे ४०० चारचाकीची विक्री झाली असावी.
- घनश्याम चव्हाण, चव्हाण शोरूम, सोलापूर

दुचाकींची विक्री
^वाहन खरेदीसाठी यंदा चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व जिल्ह्यात अंदाजे २५०० दुचाकींची विक्री झाली. चांगल्या पावसाने ग्राहकांनी वाहन खरेदीचा आनंद घेतला.
नितीन बिज्जरगी, संचालक, कायझन होंडा
वॉशिंग मशीनला पसंती
गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी दसऱ्याला २५ ते ३० टक्क्यांपर्यंत विक्री झाली. पाऊस चांगला झाल्याने वॉशिंग मशीन खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी पसंती दिली. ऑनलाइन खरेदी वाढली तरी त्याचा परिणाम दिसला नाही.
मंगेश कस्तुरे, वितरक

सोन्याचे दिवस
^सोन्याच्यादरात १२०० रुपयांची घट झाल्याने विजयादशमीला सोन्याची चांगली विक्री झाली. पाऊस चांगला झाला तरी ग्रामीण भागातील ग्राहक अजूनही बाहेर पडलेला दिसून आला नाही. शहरी ग्राहकांचा प्रतिसाद होता.
सिद्धाराम शिंगारे, उपाध्यक्ष राज्य सराफ फेडरेशन
बातम्या आणखी आहेत...