आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरच्‍या भाग्यश्रीने महाराष्ट्राला लावलेय वेड, 'घाडगे अँड सून' मध्‍ये सूनेची भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सध्या सुरू असलेली मालिका घाडगे अँड सूनमध्ये सोलापूरची भाग्यश्री लिमये ही सुनेची भूमिका साकारत आहे. आपल्या मोहक अभिनयाने तिने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लागले आहे. तीसहून अधिक फोटो जाहिरातीत मॉडेलिंग आणि तनिष्कच्या राष्ट्रीय जाहिरातीत काम केलेल्या भाग्यश्रीने चंदेरी दुनियेत आपले नाव कसदार अभिनयात कोरले आहे. 
 
मध्यमवर्गीय कुटुंबातील भाग्यश्रीचे चौथीपर्यंतचे शिक्षण लिटिल फ्लॉवर स्कूलमध्ये तर १२ वीपर्यंतचे शिक्षण इंडियन मॉडेल स्कूलमध्ये झाले आहे. पुढे मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटमधून आपले बीसीए पूर्ण केले आणि थेट पुण्याचे सिम्बॉयसिस कॉलेज गाठले. तिथे एमसीए केले. मोठ्या कंपनीत नोकरी केली. दरम्यान, श्रावण क्वीन होण्याचा मान तिला मिळाला. आणि तिथून मॉडेलिंगच्या जगात तिने प्रवेश केला. त्यानंतर तिने कमीत कमी ३० जाहिराती केल्या. अनेक ऑडिशन दिल्यानंतर तनिष्कची रमेश भाटकर यांच्यासोबतची राष्ट्रीय स्तरावरची जाहिरात केली. त्यामुळे ती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. भाग्यश्रीचे वडील माधव लिमये हे शिवशाही लक्ष्मी विष्णू येथील निवृत्त व्यवस्थापक आहेत. आई अनुराधा लिमये या नूमवि शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका आहेत. 
 
हे यश आई-बाबांचेच 
माझ्याप्रत्येक निर्णयात आई-बाबा सोबत होते आणि आहेत. त्यांच्या विश्वासामुळेच मी हे छान दिवस पाहू शकतेय. मी असे आव्हानात्मक क्षेत्र निवडले तरी आई-बाबा माझ्या सोबत राहून बळ देत होते. त्या पाठबळामुळेच मी पुढे गेले. आत्मविश्वास कधी डगमगू दिला नाही की, घाबरले नाही. खूप कष्ट केले आणि आज हे यश मिळवले आहे. खूप आनंद होतो आई-बाबांना आनंदी पाहून. दिग्दर्शक महेश तागडे, सहकलावंत टेल टेल कंपनी आणि सोलापूरकरांचे खूप आभार. ते माझ्या मालिकेला जे प्रेम देताहेत त्याने ही जादू घडत आहे. 
 
मी खूप आनंदी 
भाग्यश्रीमध्ये लहानपणापासूनच चमक होती. तिने शिक्षण, नोकरी या सगळ्या गोष्टींचा समतोल राखून पुढे आपले करिअर केले. याचा आनंद जास्त आहे. ती टीव्हीवर दिसली की, मन भरून येते. तिच्या कष्टाचे चीज झाले. ती अशीच पुढे जावी, ही इच्छा आहे. 
- अनुराधा लिमये, भाग्यश्रीची आई 
 
 
बातम्या आणखी आहेत...