आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

११ बदल करून जुळे साेलापूर विकास आराखडा केला मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जुळे सोलापूर भाग एक आणि दोनच्या विकास आराखड्यात राज्याच्या नगरविकास खात्याने ११ ठिकाणांत बदल केला. त्यानंतर त्याला मंजुरीही दिली. आणखी आठ ठिकाणी बदल सुचवून त्यावर हरकती मागवल्या अाहेत. मंजुरीचा शासन निर्णय महापालिकेला मिळाला. जुळे सोलापूर आणि हैदराबाद रस्त्यावरील विडी घरकुल भागाचा आराखडा पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) तयार केला होता. तो महापालिकेकडे वर्ग झाल्याने नवीन विकास आराखडा तयार करण्यात आला. मंजुरीसाठी नगरविकास खात्याकडे पाठण्यात आले होते.
जुळेसोलापूर भाग-एकला मंजुरी : जुळेसोलापुरात ग्रंथालयासाठी १६०० चौरस मीटर जागा आहे. त्यापैकी ३८५ चौरस मीटर जागा ग्रंथालयासाठी, अन्य जागा रहिवासी झोनसाठी करण्यात आली. या जागेचा शासकीय दर एक कोटी इतके आहे. ही खासगी जागा आहे. तीन हजार चौरस मीटर जागा पोस्ट कार्यालयासाठी होती. त्यात पोस्ट कार्यालय वगळून रहिवास झोन करण्यात आला. ही जागा केंद्र शासनाची आहे. खासगी जागेवरील ओपन स्पेस कायम ठेवण्यात आले आहेत. काही भागात २५ मीटर रस्ता ठेवला आहे. रस्ते आणि रेल्वेच्या जागा अविकसित आहेत, असे शासनाने म्हटले आहे.

मंजूर प्लॅन जैसे थे ठेवण्याची मागणी
शासनाने मंजूर केलेले आरक्षण आणि सूचना हरकती मागवलेल्याची प्रत सहाय्यक संचालक नगररचना विभागास मिळाली. सूचना हरकती पुन्हा मागवून त्यावर सुनावणी होईल. त्यानंतर अंतिम मंजुरी मिळेल. जुळे सोलापूर विकास आराखड्यात ‘म्हाडा’ने मंजूर केलेला प्लॅन ‘जैसे थे’ ठेवावे, अशी मागणी नगरसेवक नरेंद्र काळे आणि नगरसेवक शैलेंद्र आमणगी यांनी केली.

विडी घरकुल भागात असे आहे आरक्षण
विडी घरकुल भागात खेळाचे मैदान, हायस्कूल, प्राथमिक शाळा, सांस्कृतिक भवन, ग्रंथालय, दवाखाना, बगीचा आरक्षण आहे. या जागेवर ले-आऊट मंजूर असून, उद्योग बँक सेवक आणि सेवकेतर कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित आहे. त्यामुळे हे ठिकाण रहिवासी झोनसाठी असेल. ही जागा खासगी मालकीची आहे. काही रस्ते आहेत तर चिल्ड्रन पार्कचेही आरक्षण आहे.

वीज मंडळाच्या जागेवर ८०० चौरस मीटर जागेवर पार्किंग दाखवण्यात आले होते. ते शासनाने वीजमंडळासाठी राखून ठेवले. वीज मंडळाच्या जागेवर १२ मीटर रस्ता दाखवण्यात आला होता. तो रद्द करून वीज मंडळासाठी ठेवण्यात आला. हायस्कूल आणि प्राथमिक शाळेसाठी १५ हजार ६०० चौरस फूट आरक्षण कायम राहिले. मार्केटसाठी आरक्षण कायम राहिले. डिस्ट्रिक्ट सेंटरसाठी ९५०० चौरस मीटर जागा असून त्याच्या बाजूस १२ मीटर रस्ता दाखवून बदल केला. यावर सूचना हरकती शासनाने मागितले.

जुळे सोलापूर भाग दोनला भागश: मंजुरी : म्हाडाच्या पावएकर जागेवर प्राथमिक आणि प्रशालेचे आरक्षण होते. त्यात बदल करून प्राथमिक शाळेसाठी आरक्षित केले. ओपन स्पेस जागा जैसे थे ठेवण्यात आली.

असे आहेत आरक्षण
भाग: जुळेसोलापूर भाग एक : होटगी रोड, विजापूर रोड परिसरातील काही भागांसह जुळे सोलापुरातील ३७२ हेक्टर जमीन. त्यावर ५५ आरक्षण आहेत. त्यात दोन ‘म्हाडा’च्या जागेवर आणि १७ शासनाच्या जागेवर आहेत. पोलिस पोस्ट खात्याच्या जागेवर प्रत्येकी एक आणि अन्य खासगी जागेवर आरक्षण टाकले होते.

भाग: यातहैदराबाद रस्त्यावरील विडी घरकुल परिसराचा भाग येतो. त्यावर ३४ आरक्षणे आहेत. त्यापैकी ११ ‘म्हाडा’च्या जागांवर, अन्य खासगी जागेवर आरक्षण आहेत.
बातम्या आणखी आहेत...