आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७७ संस्थांचा ठावठिकाणाच नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पिशवीतल्या सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्याची मोहीम सोलापूर शहर आणि जिल्ह्यात धडाक्यात सुरू आहे. आतापर्यंत ११०८ संस्थांचा सर्व्हे पूर्ण झाला. त्यात ७७ संस्थांचा ठावठिकाणा आढळून येत नाही असे आढळले. सप्टेंबर अखेरपर्यंत ही मोहीम असून, सुमारे २७०० संस्थांची नोंदणी रद्द होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने गुरुवारी शहर आणि जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यात सोलापूर शहरातील ७४ संस्थांचा ठावठिकाणा आढळून येत नाही असे आढळले. उत्तर सोलापूर तालुक्यात अशाच संस्था बेपत्ता आहेत. अशा संस्थांची नोंदणी लगेच रद्द होईल, असे जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी दिली. राज्यातील लाख पिशवीतल्या संस्था बंद करण्याची माेहीम सुरू झाली आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व्हे पूर्ण करून डिसेंबरअखेर संस्था नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले अाहेत.

सर्व्हेतील माहिती ऑनलाइन भरायची आहे. त्याचे प्रशिक्षण िनयुक्त कर्मचाऱ्यांना देण्यात आले. उद्दिष्टाप्रमाणे चालते किंवा कसे याबाबतची नेमकी माहिती भरायची अाहे. म्हणजेच चालू उत्पादन, त्याची उलाढाल, बँकेतील व्यवहार आदींची माहिती. यात खोटी माहिती देण्याचा प्रकार होणार नाही. झालाच तर तो नियुक्त कर्मचाऱ्याचा दोष ठरेल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व्हेतील कर्मचारी संस्था चालकांना थेट भेटून सांगतात- संस्था दाखव आणि उद्देश स्पष्ट कर... या पद्धतीने हा सर्व्हे सुरू आहे. बी.टी. लावंड, जिल्हा उपनिबंधक
संस्था दाखवा आणि उद्देश स्पष्ट करा

१७२ संस्था बंद
शहरातील१७२ संस्था बंद अवस्थेत आहेत. अक्कलकोटमध्ये आणि उत्तर सोलापूरमध्ये अशा १८५ संस्था बंद आहेत. या संस्थांना ‘नोंदणी रद्द का करू नये’ अशी विचारणा करणाऱ्या नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिंबधक लावंड म्हणाले.

अशी आहे मोहीम
हजार२३६ एकूण संस्था
७८ सर्व्हेतील कर्मचारी
११०८ संस्थांचा सर्व्हे पूर्ण
१८५ संस्थांना नोटिसा देणार
७७ संस्थांचा ठावठिकाणाच नाही
सर्वेक्षण