आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur District 117 Gram Panchayats For 2291 Candidates

जिल्ह्यात ११७ ग्रामपंचायतींसाठी २२९१ उमेदवार राहिले रिंगणात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्ह्यातील१२८ ग्रामपंचायतींसाठी हजार ५४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, गुरुवारी अर्ज माघार घेण्याच्या मुदतीत हजार २५ जणांनी माघार घेतल्याने आता ११७ ग्रामपंचायतीसाठी हजार २९१ उमेदवार िरंगणात राहिले. छाननीमध्ये जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून पंढरपूर तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचातींचा समावेश आहे. माघार घेण्याच्या दिवशी उत्तर सोलापूर तालुक्यातून ४९, दक्षिण सोलापूर तालुक्यातून ३२४, बार्शी तालुक्यातील ६९, अक्कलकोट तालुक्यातील १२८, मोहोळ तालुक्यातील १२७, करमाळा तालुक्यातील २१९, पंढरपूर ५५४, सांगोला ३०७, मंगळवेढा २९५ असे एकूण हजार २५ जणांनी माघार घेतली आहे.
तालुकानिहाय रिंगणातील
उमेदवारांची संख्या.
..
उत्तरसोलापूर १२०, दक्षिण सोलापूर ३७७, बार्शी ८६, अक्कलकोट २३५, मोहोळ १७६, करमाळा ३९०, पंढरपूर २८६, सांगोला ३२१, मंगळवेढा २९८.

११ग्रामपंचायती बिनविरोध
दक्षिणसोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा, वडजी लिंबीचिंचोळी, बार्शी तालुक्यातील तुळशीदासनगर, करमाळा तालुक्यातील सरपडोह, मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी तर पंढरपूर तालुक्यातील देवडे, खरसोळी, शेगाव दुमाला, तनाळी भाळवणी या ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.