आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँक निवडणूक : मोहिते पिता-पुत्र, म्हेत्रे, साळुंखे, हसापुरेंविरोधात लक्षवेधी लढत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्हामध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी १९ पैकी १३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उरलेल्या सहा जागांसाठी निवडणूक लागली आहे. बँकेवर एकतर्फी सत्ता असलेले ज्येष्ठ नेते खासदार विजयसिंह माेहिते, माजी खासदार रणजितसिंह मोहिते यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले आहे. तसेच आमदार दीपक साळुंखे, सिद्धाराम म्हेत्रे, सुरेश हसापुरे, सुभाष शेळके यांनाही निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे.

अर्ज मागे घेण्याचा गुरुवारी शेवट दिवस होता. एकूण ९३ जणांनी माघार घेतली. त्यात पालकमंत्री विजय देशमुख, आमदार भारत भालके, मनोहर सपाटे ही प्रमुख मंडळी आहेत.
काँग्रेस भवनात माजी आमदार दिलीप माने, श्री. भालके, जिल्हाध्यक्ष संतोष पाटील शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, कल्याणराव काळे यांनी बैठक घेत चर्चा केली, तर माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संजय शिंदे प्रशांत परिचारक यांनी जिल्हा परिषदेत कृषी सभापती पंडित वाघ यांच्या दालनामध्ये बसून चर्चा केली.

नागरी बँका पतसंस्था मतदारसंघातून आमदार बबनराव शिंदे यांना बिनविरोध केले. शेवटच्या क्षणी रश्मी बागल यांना महिला प्रतिनिधी मतदारसंघातून बिनविरोध करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

म्हेत्रेंसाठी परिचारकांनी सोडली जागा
सत्ताधारीपॅनेलचे इतर मागास वर्गातून परिचारकांचे समर्थक बाळासाहेब माळी यांनी माघार घेतली. विधान परिषदेची निवडणूक सोपी करण्यासाठी परिचारकांनी ती जागा म्हेेत्रे यांच्यासाठी सोडली. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी ती जागा बिनविरोध होऊ देण्यासाठी बनशेट्टी यांचा अर्ज कायम ठेवला. म्हेत्रे सत्ताधाऱ्यांच्या पॅनेलमध्ये आले. मात्र, विद्यमान संचालक सुरेश हसापुरे यांना वगळण्यात आले आहे. त्यांना जागा मिळू शकलेली नाही.

रणजितसिंहांविरुद्ध समाधान आवताडे
कृषी,पणन प्रक्रिया मतदारसंघातून माजी खासदार रणजितसिंह मोहिते यांच्या विरोधात समाधान आवताडे यांनी उमेदवारी कायम ठेवली. मागील निवडणुकीत उमेदवारी मागे घेतल्यानंतर त्यांना काहीही मिळाले नव्हते. त्यामुळे यंदा निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.

विजयसिंहांच्याविरोधात के. के. पाटील
माळशिरससोसायटी मतदार संघावर खासदार विजयसिंह मोहिते यांचे पारंपरिक विरोधी के. के. पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवली. छाननी दरम्यान त्यांनी विजयसिंह, रणजितसिंह दीपक साळुंके यांच्या अर्जावर हरकती घेतल्या. पण त्या सर्व फेटाळून लावण्यात आल्या.
जिल्हा परिषदेत कृषी सभापती पंडित वाघ यांच्या दालनात चर्चा करताना संजय शिंदे, प्रशांत सुधाकरपंत परिचारक राजेंद्र राऊत.

राष्ट्रवादी भवन येथे गुजगोष्टी करताना आमदार बबनराव शिंदे, सिद्धाराम म्हेत्रे, मनोहर डोंगरे, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, प्रकाश यलगुलवार, कल्याणराव काळे आदी.

ठळक घटना अशा
-विकास सोसायटी मतदारसंघ : दिलीप सोपल (बार्शी), संजय शिंदे, जयवंतराव जगताप (करमाळा), राजन पाटील (मोहोळ), प्रशांत परिचारक (पंढरपूर), शिवानंद पाटील (अक्कलकोट), चंद्रकांत देशमुख (सांगोला), दिलीप माने (उत्तर सोलापूर), बबनराव आवताडे (मंगळवेढा).
-महिला राखीव मतदारसंघ : रश्मी बागल (करमाळा), सुनंदा बाबर (सांगोला),
-अनुसूचित जाती जमाती : भारत सुतकर
-नागरी बँक, पतसंस्था मतदारसंघ : बबनराव शिंदे
उमेदवाराने माघार घ्यावे म्हणून विनवणी करताना नेते.
--सहा जागांसाठी १२ उमेदवार मैदानात
-दोन दिग्गज संचालकांची माघार घेत वारसदारांना संधी
-सत्ताधारी पॅनेलने कपबशी चिन्हाची केली मागणी

पुढील स्‍लाइडवर वाचा ... अन् देवकते निघून गेले
बातम्या आणखी आहेत...