आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन चिमुरडींसह विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, सासरी छळ झाल्याचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी - दोन लहान मुलींसह विवाहितेने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. मंगळवारी (दि. २७) दुपारी दोनच्या सुमारास कुसळंब येथे हा दुर्दैवी प्रकार घडला. राधा बाबासाहेब काशीद (वय २३), आदिती (५), अक्षरा (३) अशी त्यांची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. विवाहितेच्या माहेरकडील मंडळींनी सासरकडून छळ होत असल्याचा आरोप केला आहे. पांगरी पोलिसांत अकस्मात मृत अशी नोंद झाली. 
 
सायंकाळी येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पोलिसांनी आणला होता. त्यावेळी खांडवी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. मुलीचे वडील बाहेरगावहून उशिरा येणार असल्याने शवविच्छेदनाचे काम थांबवण्यात आले हाेते. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
 
याबाबत माहेरचे नागरिक महादेव सौदागर आणि कोंडिबा वायकुळे म्हणाले, बजरंग अंबऋषी चौधरी (खांडवी, ता.बार्शी) यांची मुलगी राधा हिचा २००१ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर राधा हीस सासरच्या व्यक्तींकडून सतत मानसिक शारीरिक त्रास दिला जात होता. दहा हजार रुपयांची मागणीही करण्यात येत होती. पोलिसांनी अगोदर अंत्यविधी उरकून घ्या, नंतर तक्रार नोंदवून घेण्यात येईल, असे सांगितल्याचे त्यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...