आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक हालचालींना चढू लागला जोर, सेनेलाच नाही युतीची गरज, भाजप स्वबळावर लढणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर : शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, गजानन कीर्तिकर हे सोलापूरला आले असताना त्यांच्याशी युतीबाबत चर्चा झाली. पण आताची परिस्थिती पाहता शिवसेनेला युतीची गरज आहे, असे वाटत नाही. त्यामुळे भाजपनेदेखील आता महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी केली आहे, अशी भूमिका पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. 
 
शासकीय विश्रामगृहात पत्रकारांच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. सेना आमच्याशी युती करायला तयार असेल तर त्यासाठी भाजपचे दरवाजे सेनेसाठी उघडे असल्याचेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
 
भाजपने युतीसाठी प्रयत्न केले. मात्र शिवसेनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. आम्हाला काेण्या व्यक्तीबरोबर नाही तर पक्षाबरोबर युती करायची आहे. यापूर्वीच सेनेने इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम केला आहे. आम्हीही बुधवारपासून इच्छुकांच्या मुलाखती घेत आहोत. 
 
जर युती झाली नाही आणि छोटे मित्र पक्ष सोबत घेऊ. १२ नगरसेवक भाजपात येण्यासाठी इच्छुक होते. मात्र शहर भाजपातच पदाधिकारी कार्यकर्त्यांची संख्या वाढली असून, त्या १२ नगरसेवकांना पक्षात घेऊन काय करायचे, हा प्रश्न निर्माण झाला असल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. 
 
ढोलाताशांचा गजर, समर्थकांकडून होणारा जयघोष अन् गळ्यात पक्षचिन्हाचे उपरणे घातलेल्या इच्छुकांच्या भाऊगर्दीने काँग्रेस भवन परिसर फुलला. पक्ष निरीक्षक मोहन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी काँग्रेस भवनमध्ये प्रभाग एक ते आठ, १०, ११ १९ मधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सकाळी साडेदहा वाजता मुलाखतींना सुरुवात झाली.
 
पहिल्या टप्प्यामध्ये प्रभाग एक ते सातमधील ७८ इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. दुपारी साडेतीन वाजता दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतींना सुरुवात झाली. 

कार्यकर्त्यासइचारत न्हाव मग पक्ष कसा वाढणार? 
प्रभागक्रमांक एकमधून इच्छुक असलेल्या धोंडाबाई चौगुले यांनी गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत असल्याचे सांगत उमेदवारीची मागणी केली. आम्ही, पक्षासाठी रात्रंदिवस झटतोय. निवडणुकीच्या टायमाला तुम्ही प्रचारास सुदीक येत नाही, म्होरं म्होरं फिरणाऱ्या चार लोकास्नी घेऊन सभा घेताव, आमच्यासारख्या कार्यकर्त्यास इचारत पण न्हाव, मग पक्ष कसा वाढणार? अशा शब्दांत पक्षश्रेष्ठींसमोर समन्वय समितीला घरचा आहेर दिला. माजी महापौर अॅड. बेरिया यांनी धोंडाबाईंना मध्येच थांबवत, तुमच्या भावना पोहोचल्या, असे म्हणत विषयाला बगल दिली. 
 
इच्छुकांनी मुलाखतीत येण्यापूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. काहीनी रिक्षा, खासगी वाहनातून घोषणा देण्यासाठी कार्यकर्त्यांना सोबत आणले होते. उंबरजे, अविनाश बनसोडे यांच्यासमवेत महिलांची संख्या मोठी होती.
 
प्रभाग चारमधून माधुरी विभूते, केदार म्हमाणे, कुणाल बाबरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्याचबरोबर अमोल बंगाळे, कुणाल बाबरे, नालंदा शिंदे, सोनाली लाड, प्रा. संघमित्रा चौधरी, सिद्राम अट्टेलूर, स्मृती इंगळे, जुलेखा बिजापुरे, शमशाद काझी, महेश बटगिरी, दशरथ बापट,
 
अशपाक बागवान, जाबीर अल्लोळी, अनंत जोशी राणी नारायणकर, सुनीता बनसोडे, अहमद मोमीन, रियाज मोमीन, कृष्णा सरवदे, डॉ. फारुक मंगलगिरी, नागनाथ कदम आदींनी समर्थकांच्या सोबत येऊन उमेदवारी दाखल केली. इच्छुकांमध्ये युवक-युवतींची संख्या अधिक होती. प्रभाग चारमधून मानसी हबीब यांनी युवतींसवमेत शक्तिप्रदर्शन केले. 
बातम्या आणखी आहेत...