आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर उड्डाणपुलाच्या कामाला २०१६ मध्ये होणार सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर; शहरातवाहतूक सुरळीत करण्यासाठी शहरांतर्गत उड्डाणपूल बनवण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजे ७०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. कोणत्या ठिकाणी, पूल कसा उभा करायचा आणि कशा पद्धतीने वाहतूक सुरळीत होईल, याबाबत आराखडा करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. या निविदा सप्टेंबरच्या अखेर खुल्या करण्यात येतील. तसेच पुढील वर्षाच्या सुरुवातीला पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
उड्डाणपुलाचा तांत्रिक आराखडा तयार करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. निविदा भरण्याची अंतिम तारीख २४ सप्टेंबर असून या दिवशी निविदा खुल्या करण्यात येतील. मक्ता निश्चित केल्यानंतर अहवालासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागेल. हा अहवाल केंद्र शासनाकडे पाठवण्यात येईल. तेथून अंतिम मंजुरीला सुमारे वीस ते पंचवीस दिवस लागतील. त्यानंतर पुलाच्या कामाचे टेंडर काढण्यात येईल आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला कामाला प्रत्यक्षात प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

या दोन मार्गांवर उड्डाणपूल
जुनापुणे नाका, पांजरपोळ चौक, सुपर मार्केट, कोटणीस स्मारक, रेल्वे स्टेशन, डीआरएम कार्यालय, सात रस्ता, पत्रकार भवन, होटगी नाका, गुरुनानक चौक तसेच जुना बोरामणी नाका ते भद्रावती पाण्याची टाकी, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, अशोक चौक पाेलिस चौकी, गेंट्याल चौक ते गुरुनानक चौक या दोन प्रमुख मार्गांवर उड्डाणपूल होणार आहेत. उड्डाणपुलासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले होते. त्याचा पाठपुरावा केला होता. १० जून २०१५ रोजी या उड्डाणपुलाला मान्यता मिळाळी आणि ७०० कोटी रुपये खर्चाला तत्त्वता मंजुरी िमळाली. मार्केट यार्डासमोर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. सोलापूर-पुणे आणि साेलापूर-हैदराबाद हे दोन्ही महामार्ग जोडणारा उड्डाणपूल व्हावा, यासाठी शासन दरबारी प्रस्ताव असून यालाही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

^शहराचा कायापालट करून सोलापूरकरांचा विश्वास सार्थ करणार आहे. शहरात ७०० कोटी रुपयांच्या उड्डाणपुलास मंजुरी असून याचा आराखडा तयार करण्यासाठी मक्तेदार नेमण्यात येणार आहे. यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन २०१६ च्या प्रारंभी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. विजयकुमारदेशमुख, पालकमंत्री