आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकीत नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम यायला हवेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरसह राज्यातील सहा तंत्रनिकेतनचे पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये रूपांतर करण्याचा शासन निर्णय नुकताच जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील शिक्षण तज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र त्याचबरोबर सोलापूरला पूरक ठरणारा टेक्स्टाईल पदवी अभ्यासक्रमाबरोबर येथे उपलब्ध नसलेले नावीन्यपूर्ण पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याची संधी असल्याचे मतही व्यक्त केले.
राज्यातील सोलापूर, रत्नागिरी, लातूर, यवतमाळ, धुळे आणि जालना येथील शासकीय तंत्रनिकेतन टप्प्याटप्याने बंद करून त्याच जागेत ही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये रूपांतरित होत आहेत.

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यतेच्या अधीन राहून येत्या जूनपासून ही महाविद्यालये सुरू होऊ शकतील. मात्र त्यापूर्वी त्यांना विद्यापीठाच्या संलग्नतेची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. सध्या राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ उर्वरितपान
(बाटू,लोणेरे) यांचे संलग्नीकरणाचा पर्याय आहे. मात्र शासन निर्णयात याची स्पष्टता नाही. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या बाबत समकक्षता, एकवाक्यता येण्यासाठी लोणेरे येथील बाटू विद्यापीठाशी संलग्नीकरण होईल. या विद्यापीठाशी राज्यातील इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांनीही संलग्नता घेण्याचा निर्णय अजून संस्था स्तरावर प्रलंबित आहे.
सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सध्या स्थापत्य, संगणक, विद्युत, अणुविद्युत दूरसंचरण, यंत्र अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान वस्त्रनिर्माण शास्त्र याचे पदविका अभ्यासक्रम सुरू आहेत. यातील स्थापत्य, संगणक, विद्युत, यंत्र अणुविद्युत दूरसंचरण अभियांत्रिकी या पाच शाखांमध्ये पदवी अभ्यासक्रमांना शासकीय अभियांत्रिकीतून प्रवेश होतील. यासाठी प्राध्यापकाची नऊ पदे, सहयोगीची अशी एकूण १५ पदे नव्याने निर्माण करावी लागतील. तर प्राचार्य पद, सहयोगी प्राध्यापक १२ पदे ५२ सहायक प्राध्यापक ही पदे रूपांतरित करण्यात येतील. प्रत्येक शाखेत ६० विद्यार्थी प्रवेश क्षमता असेल.

नवेट्रेंडची चर्चा
कार्गो विमानतळ होणार आहे म्हणून ट्रान्सपोर्टेशन अँड लॉगेस्टिक्स अभियांत्रिकी, तसेच कोरडवाहु शेती मोठ्या प्रमाणात आहे म्हणून अॅग्रीकल्चरल इंजिनिअरिंग, बायोमेडिकल इंजिनिअरिंग यांची गरज आहे. चित्रपट सृष्टीला पुरक ठरणारे अॅडिओ साऊंड इंजिनिअरिंग , ग्लास अॅड सिरॅमिक्स , रेल्वे अभियांत्रिकी , एन्हायमेंर्टल इंजिनिअरिंग, मेडिको अभियांत्रिकी अशा नव्या ट्रेंडचीही गरज सोलापूरातील नव्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी आहे.

संलग्नतेचा विषय शासन स्तरावरच होईल
^शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये लोणेरेच्या ‘बाटू’ विद्यापीठाशी संलग्न होऊ शकतात. येत्या जूनपासून ही संलग्न होतील, अर्थात याचा निर्णय शासन स्तरावरच होईल.” डॉ.देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ

टेक्स्टाईल हवे
^आजइंजिनिअरिंगचे अनेक असे विषय आहेत की तिथे मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा आहे. ते विषय सोलापुरात शिकवले तरच तरुणांना चांगला रोजगार उपलब्ध होईल. सोलापुरात कुठल्या फिल्डमध्ये नोकऱ्या उपलब्ध होतील ? याचा अभ्यास करून ते विषय नवीन कॉलेजमध्ये शिकवले जावेत. सोलापुरात टेक्स्टाईल इंजिनिअरिंग हवेच आहे. त्याचबरोबर कार्गो विमानतळ होणार आहे. यामुळे कार्गो ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाचाही विचार करणे अपेक्षित आहे.” योगीन गुर्जर, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक महासंघ, सोलापूर

नवीन ट्रेंड मिळावेत
^शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापनेच्या शासन निर्णयात स्थापत्य, संगणक, विद्युत, यंत्र अणुविद्युत दूरसंचरण अभियांत्रिकी हे पाच अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्याचा उल्लेख आहे. मात्र सोलापुरात टेक्स्टाईल उद्योगास पूरक ठरणाऱ्या अभ्यासक्रमाचा उल्लेख नाही. हे पाचही अभ्यासक्रम इतर महाविद्यालयातही सुरू आहेत. यामुळेच इतर ट्रेंडसचा ही विचार करणे गरजेचे आहे.” डॉ.शशिकांत हलकुडे, प्राचार्य, वालचंद अभियांत्रिकी, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...